मराठी बातम्या /बातम्या /देश /

IIT इंजिनीअर, वरिष्ठ पदांवर नोकरी केलेले हे वयोवृद्ध फुटपाथवर सापडले दयनीय अवस्थेत

IIT इंजिनीअर, वरिष्ठ पदांवर नोकरी केलेले हे वयोवृद्ध फुटपाथवर सापडले दयनीय अवस्थेत

हे उच्चशिक्षित आजोबा 92 वर्षांचे असल्याचं सांगतात. फुटपाथवर थंडीने कुडकुडत झोपलेले असताना दयनीय अवस्थेत ते सापडले.

हे उच्चशिक्षित आजोबा 92 वर्षांचे असल्याचं सांगतात. फुटपाथवर थंडीने कुडकुडत झोपलेले असताना दयनीय अवस्थेत ते सापडले.

हे उच्चशिक्षित आजोबा 92 वर्षांचे असल्याचं सांगतात. फुटपाथवर थंडीने कुडकुडत झोपलेले असताना दयनीय अवस्थेत ते सापडले.

  • Published by:  News18 Desk
ग्वाल्हेर, 08 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी ग्वाल्हेर (Gwalior)  इथे फुटपाथवर कचऱ्याच्या ढिगात अन्न शोधताना माजी पोलिस निरीक्षक मनीष मिश्रा (Manish Mishra)सापडले होते. ही घटना ताजी असतानाच  IIT कानपूर (Kanpur) येथून उत्तीर्ण झालेले एक वयस्कर आजोबा फुटपाथावर एका दयनीय अवस्थेत सापडले. हे आजोबा त्यांचं  वय 92 वर्षे असल्याचं सांगत आहेत. तसंच ते आयआयटी कानपूरमधून उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर, चांगल्या संस्थांमध्ये नोकरीही केली होती. आता या आजोबांना 'स्वर्ग सदन' या  आश्रमात आश्रय दिला आहे, इथेच मनीष मिश्रा देखील राहात आहेत. ग्वाल्हेरमधील स्वर्ग सदन आश्रम चालवणाऱ्या विकास गोस्वामी यांना एक ओळखीचा फोन आला. 'शिंदे की छावणी' येथील बस स्टँडच्या फुटपाथवर एक वृद्ध व्यक्ती थंडीत कुडकुडत पडला असल्याचं समोरून फोनवर सांगण्यात आलं. विकास त्याच्या साथीदारांसोबत त्या संबंधित ठिकाणी पोहोचला. त्याने जेव्हा चादर ओढली आणि त्या वयस्कर आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो वृद्ध व्यक्ती चक्क इंग्रजीत बोलू लागला. हे ऐकून विकासला थोडा धक्का बसला. तेव्हा त्यांना समजले की ते उच्चशिक्षित आहेत. पण परिस्थितीने त्यांचा छळ केला आहे. IIT कानपूर येथून उत्तीर्ण विकास गोस्वामी यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचं नाव सुरेंद्र वशिष्ठ असल्याचं कळालं. तर बरेली येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांचा पुतण्या सध्या ग्वाल्हेरच्या गांधीनगर भागात राहतो, असंही त्यांनी सांगितलं. ओळख पटल्यानंतर विकासने त्या वयोवृद्ध आजोबांना 'स्वर्ग सदन' आश्रमात घेऊन आले. वाचा - रस्त्याकडेला पडला होता भिकारी; पोलीस अधिकाऱ्यांनी गाडी थांबवली आणि बसला धक्का त्यांच्याशी आणखी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते ग्वाल्हेरमधील मिशहिल स्कूलचे टॉपर असल्याचं समजलं. तसेच 1969 मध्ये त्यांनी IIT कानपूरमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली आणि 19972 साली लखनऊच्या DAV महाविद्यालयातून एलएलएम केलं असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील खादी भंडारसह अनेक ठिकाणी काम केलं असल्याची माहितीही मिळाली. त्यांचा पुतण्या ग्वाल्हेर मध्येच राहतो... सुरेंद्र वशिष्ठ यांना पूर्ण परिवार आहे. ते सर्वजण परदेशात राहतात. कधीकधी मी त्यांना भेटायला जातो. तर कधीकधी माझे कुटुंबिय मला भेटायला येता, असं सुरेंद्र सांगत असले तरी यांची ही अवस्था कशी झाली? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. विकासने सुरेंद्रच्या या पुतण्याशी संपर्क साधला असता त्याने आपल्या सर्व गोष्टी खऱ्या असल्याचं सांगितलं. परंतु हेही सांगितलं की सुरेंद्र अविवाहित आहेत. सध्या त्यांना ग्वाल्हेर येथील स्वर्ग सदन आश्रमात आश्रय दिला आहे.
First published:

Tags: Gwalior

पुढील बातम्या