सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी मैनपुरी, 17 जून : चित्रपटांमध्ये पुनर्जन्माच्या घटना तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. पण खऱ्या आयुष्यातही अनेकांचा यावर विश्वास आहे. तर यावर विश्वास न ठेवणारेही बरेच लोक आहेत. मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका व्हायरल व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा दावा करत आहे की, तो 8 वर्षांपूर्वी सर्पदंशामुळे मरण पावला होता. तसेच त्याचे नाव मनोज होते. त्याचा स्वतःच्या मुलीच्या पोटी पुनर्जन्म झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी जागीरच्या रतनपूर गावातील आहे. याठिकाणी हा मुलगा आता आपल्या आजीला बायको असल्याचे सांगत आहे तर आपल्या आईला आपली मुलगी म्हणत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. आता पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर श्रद्धा आणि अंधश्रद्धेची चर्चा सुरू झाली आहे. 9 जानेवारी 2015 रोजी रतनपूरचे रहिवासी मनोज मिश्रा हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना कोब्रा साप चावला. त्यानंतर त्यांची दृष्टी गेली. कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी त्यांची मुलगी रंजनाही गरोदर होती. तर मनोज मिश्रा यांचे तेरावे होण्याआधीच त्यांची मुलगी रंजना हिने रंजनाने एका मुलाला जन्म दिला. यानंतर त्याचे नाव आर्यन ठेवण्यात आले.
आश्चर्याची म्हणजे जेव्हा आर्यन त्याच्या आईसोबत मैनपुरीला आला आणि त्याने त्याच्या पुनर्जन्माची कहाणी आपल्या कुटुंबीयांना सांगितली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यन सांगत आहे की, साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर तो बेशुद्धावस्थेत गेला होता. आता हा मुलगा आता आपल्या आजीला बायको असल्याचे सांगत आहे तर आपल्या आईला आपली मुलगी म्हणत आहे.
जेव्हा आर्यनने त्याच्या आजोबांच्या बँकेत जमा केलेल्या पैशाबद्दल सांगितले तेव्हा लोकांना अधिक आश्चर्य वाटले. तर आर्यन त्याच्या दोन्ही मामांना आपला मुलगा असल्याचे सांगत आहे. यामध्ये एका मुलाचे नाव अनुज आणि दुसऱ्या मुलाचे नाव अजय आहे. दरम्यान, या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.