जाहिरात
मराठी बातम्या / देश / 8 मुलींची आई होती गर्भवती, शेतात काम करताना घडलं भयानक, वाचून बसेल धक्का!

8 मुलींची आई होती गर्भवती, शेतात काम करताना घडलं भयानक, वाचून बसेल धक्का!

गीता देवी

गीता देवी

शेतात काम करताना एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडली.

  • -MIN READ Local18 Karauli,Karauli,Rajasthan
  • Last Updated :

धर्मेंद्र शर्मा, प्रतिनिधी करौली, 27 जून : सर्पदंशाच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात काम करणाऱ्या 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेला साप चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्पदंशामुळे या महिलेसह तिच्या न जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. गीता देवी (42) असे मृत महिलेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना राजस्थान राज्यातील मासलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतिया पुरा गावात घडली. करौली रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गीताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मासलपूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिव कुमार यांनी सांगितले की, रतिया पुरा गावात सर्पदंशाने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.

News18लोकमत
News18लोकमत

मृत गीता देवी या रती पुरा येथील रहिवासी राजपाल यांच्या पत्नी होत्या. गीता देवी शेतात काम करत होत्या. तेव्हा एका सापाने त्यांना दंश केला. यानंतर नातेवाईकांनी त्यांना देवाच्या एका देवाच्या ठिकाणी नेण्यात आले. यानंतर त्यांना नातेवाईकांनी करौली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या महिलेला मृत घोषित केले. करौली रुग्णालयात गीताच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. ती 8 महिन्यांची गर्भवती होती. मृताला 8 मुली आहेत. मोठी मुलगी सुमारे 20 वर्षांची आणि लहान मुलगी सुमारे 3-4 वर्षांची आहे. गीता या महिलेचा नवरा खाणीत काम करतो. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात