चेन्नई, 17 ऑक्टोबर : तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यातील एका 73 वर्षीय ज्येष्ठाच्या मृत्यूबाबत विचित्र प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान रुग्णालयाकडून डेथ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ज्येष्ठांचे भाऊ त्यांना घरी घेऊन आले आणि घरी फ्रीजर बॉक्समध्ये ठेवले. तब्बल 20 तास थंडीतून त्यांचा मृत्यू झाला.
आरोग्य सेवांचे संयुक्त निर्देशक डॉक्टर मालरविझी वल्लाल यांनी मृत्यूपूर्वी डेथ सर्टिफिकेट जारी करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात तपास सुरू केला आहे. मृत बालासुब्रामण्यम कुमार (73) यांच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांना मुलं नव्हती. ते त्यांचे भाऊ सरावनन (70) यांच्यासोबत राहत होते. बालासुब्रामण्यम यांची तब्येत बिघडल्यानंतर सरावनन यांनी त्यांना सलेम येथील SIMS रुग्णालयात भरती केलं, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट जारी करीत रुग्णाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. सरावनन यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर भावाला घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर सरावनन यांनी भाड्याने फ्रीजिंग बॉक्स ऑर्डर केला. घरी बॉक्स आल्यानंतर भावाची बॉडी त्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा कंपनीचे लोक बॉक्स घेण्यासाठी आले तेव्हा फ्रीजरमध्ये ठेवलेल्या व्यक्तीच्या शरीरात जीवंत असल्याची लक्षणं दिसली. याबाबत सरावननने विचारले असता भावाच्या शरीरातून आत्मा निघण्याची वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा-पहिल्या पत्नीनंतर दुसरीचीही हत्या; पोटच्या मुलीच्या शवाचे तुकडे गोणीत भरले
कर्मचाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलीस बाला यांना घेऊन तातडीने रुग्णालयात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झआला होता. या प्रकरणाच सरावनन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.