Home /News /crime /

पहिल्या पत्नीनंतर दुसरीचीही हत्या; पोटच्या मुलीच्या शवाचे तुकडे गोणीत ठेवले भरून

पहिल्या पत्नीनंतर दुसरीचीही हत्या; पोटच्या मुलीच्या शवाचे तुकडे गोणीत ठेवले भरून

या आरोपीच्या भावाचीही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता, त्यानंतर..

    भोपाळ, 16 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने माणुसकीच्या सर्व सीमा पार केल्या. या आरोपीने अत्यंत क्रुरपणे पत्नी आणि मुलीची हत्या केली. तो इतकच करुन थांबला नाही तर त्याने दोघीच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. त्याने हे तुकडे एका गोणीत भरले आणि छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह 24 तास एका खोलीत ठेवले.  ह्रदय पिळवटून काढणारी ही घटना रीवा मुख्यालयापासून 70 किमी दूर मऊगंज पोलीस हद्दीत घडली. आरोपीच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. यानंतर तिने विधवा वहिनी प्रमिलासोबत दुसरं लग्न केलं. त्यांना 1 वर्षांची काजल नावाची मुलगीही होती. छिंदलाल साकेत याने हत्या केल्यानंतरही घरात अत्यंत साधारणपणे वागत होता. कोणाला संशय येऊ नये यासाठी हत्या केल्यानंतर तो अतिशय सर्वसामान्यपणे घरात वावरत होता. आरोपी गुरुवारी रात्री अंधारात गोणी फेकण्याच्या तयारीत होता. त्यादरम्यान गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडल आणि पोलिसांना याची सूचना दिली. हे ही वाचा-काळ्या जादूमुळे वडील गेले, मुलांनी बदला घेण्यासाठी रचला डाव, पण... मृत महिलेच्या मुलाने सांगितले की, राी वडील दारू आणि अंडी घेऊन आले होते. तिघांनी मिळून दारू प्यायले आणि त्यानंतर आम्हाला घराबाहेर काढलं. एसपी रीवा राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या हत्येमागे मोठं कट-कारस्थान असल्याची शक्यता आहे. आरोपीच्या पहिल्या पत्नीची आत्महत्यादेखील संशयाच्या फेऱ्यात आहे. आरोपीच्या मोठ्या भावाचाही मृत्यू झाला आहे. आणि भावाच्या मृत्यूनंतर त्याने वहिनीशी लग्न केलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या