Home /News /national /

वय वर्ष फक्त 5; मात्र, तिने केला हा कारनामा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

वय वर्ष फक्त 5; मात्र, तिने केला हा कारनामा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

सुरुवातीला गमतीत आणि एक खेळ म्हणून सुरू झाले होते. वान्या जेव्हा शाळेतून परतायची तेव्हा मी तिला विचारायची की, आज तू शाळेत काय शिकलीस.

    इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya Mishtra Indore) अवघ्या 5 वर्षात असा चमत्कार केला की तो कुतूहलाचा विषय ठरला आहे. 5 वर्षांच्या वान्या मिश्राला ए ते झेड पर्यंतच्या औषधांची नावे आठवतात. (5 year girl know a to z medicine names) वान्या फक्त औषधांची नावेच सांगत नाही तर कोणत्या आजारात कोणते औषध वापरले जाते, हेदेखील सांगते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद -  वान्या ए फॉर, ऍपलऐवदी ऍसाइक्लोबी, बी फॉर ब्रोमहेक्साइन अशा प्रकारची एबीसीडी म्हणते. तिला पूर्ण 26 अक्षरांच्या 26 औषधांची नावे लक्षात आहे. त्यामुळे अवघ्या 46 सेकंदात या औषधांची नावे सांगून वान्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book of Records) आपले नाव नोंदवले आहे. वान्याची आई इंदूरच्या एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. वान्याने त्यांच्याकडून अल्फाबेटिकल औषधांची नावे जाणून घेतली आहेत. वान्याची आई डॉ. पूजा मिश्रा सांगतात की, वान्याला एवढे मोठे यश मिळेल, असे आम्हाला वाटले नव्हते. सुरुवातीला गमतीत आणि एक खेळ म्हणून सुरू झाले होते. वान्या जेव्हा शाळेतून परतायची तेव्हा मी तिला विचारायची की, आज तू शाळेत काय शिकलीस. तर ती मला विचारायची मी आज काय शिकले. ती म्हणाली की, मी एबीसीडी शिकले. तर मी पण म्हणायची की, मी पण एबीसीडी शिकले. जेव्हा तिला सांगितले की, तु तुझी एबीसीडी ऐकव आणि मी माझी एबीसीडी ऐकवते. म्हणून जेव्हा मी ए ते झेडपर्यंत औषधांची नावे घेतली तेव्हा वान्या इतकी प्रभावित झाली की तिने ते सर्व नावे लक्षात ठेवून घेतले. तिने इतका चांगला सराव केला की, आज तिच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हेही वाचा - Single Use Plastic: 80 टक्के कचरा प्लास्टिकच्या बाटल्यांचा, तरीही त्यावर बंदी नाही? 'हे' आहे कारण वान्याचे वडील व्यवसायाने इंजिनिअर आहेत. ते म्हणतात की, वान्या ही अशी पहिलीच मुलगी आहे जिला फक्त फक्त औषधांची नावेच आठवत नाहीत तर त्यापेक्षा कोणत्या आजारात कोणते औषध वापरले जाते? हे पण माहिती आहे. वान्या गेल्या 10 महिन्यांपासून सराव करत होती. हे सर्व तिने आपल्या डॉक्टर आईकडून कळले. तिला वैद्यकशास्त्रात प्रचंड रस आहे, असेही तिच्या वडिलांनी सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indore News, Record

    पुढील बातम्या