Home /News /national /

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संबंधित पाच सरकारी कर्मचारी बडतर्फ! नोकरीच्या बुरख्याआड देशाशी गद्दारी

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संबंधित पाच सरकारी कर्मचारी बडतर्फ! नोकरीच्या बुरख्याआड देशाशी गद्दारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकणाऱ्या या पाच सरकारी कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानातील कलम 311(2) (c) अंतर्गत बडतर्फ करण्याची शिफारस या समितीने केली.

  नवी दिल्ली, 30 मार्च : देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना मोकळं सोडलं जाणार नाही असं वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणांतून स्पष्ट केलं आहे. जम्मू-काश्मीर सरकारमध्ये नोकरी करतानाच दहशतवाद्यांचे ओव्हरग्राउंड वर्कर (Over Ground Worker) म्हणून काम करणाऱ्या पाच सरकारी नोकरांना बडतर्फ करण्याची शिफारस जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्त करणाऱ्या एका समितीने सरकारकडे केली आहे. त्याला अनुसरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने आज (30 मार्च 22) पाच सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees) बडतर्फ केलं आहे. यामध्ये दोन पोलीस, एक शिक्षक, एक कॉम्प्युटर ऑपरेटर आणि एका मदतनीसाचा समावेश आहे. या सर्वांना भारतीय संविधानातील कलम 311(2) (c) अंतर्गत बडतर्फ करण्याची शिफारस या समितीने केली होती. पुलवामा जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल तौसीफ अहमद दार याला हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचं काम केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आलं आहे. त्याचे वडील अल-जिहाद या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी होते. 1997 मध्ये एनकाउंटरमध्ये ते मारले गेले. त्यानंतर तौसीफ जम्मू-काश्मीर पोलीस दलात (Jammu and Kashmir Police) नोकरीला लागला तरीही तो छुप्या पद्धतीने हिज्बुलच्या दहशतवाद्यांना मदत करत होताच. शोपियाँ जिल्ह्यात त्याने 5 दहशतवाद्यांना सर्वतोपरी मदत केली होती. तौसीफने आपल्या साथीदारांसोबत 2017 मध्ये एका एसपीओवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. तो एसपीओ बचावला. तौसीफने शोपियाँमधल्या एका कॉन्स्टेबललाही मारण्याचा प्रयत्न केला होता. हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाल्यावर तौसीफने दहशतवाद्यांसाठी तरुणांची भरती सुरू केली. त्याच्या कारवाया लक्षात आल्यावर पोलिसांनी शोपियाँ पोलीस ठाण्यात पब्लिक सेफ्टी अक्टअंतर्गत त्याच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला. जुलै 2017 पासून निलंबित असलेला तौसीफ हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने मोठा धोका असल्याने त्याला बडतर्फ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  Babar Murder Case: 'मी तुमचा दुसरा मुलगा; गुन्हेगारांना...'; CM योगींनी बाबर अलीच्या कुटुंबीयांना दिलं मोठं आश्वासन

  सरकारी नोकरदाराचा बुरखा वापरून दहशतवादी कारवाया फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानींच्या कृपाआशीर्वादाने सरकारी नोकरी मिळालेला गुलाम हसन हा श्रीनगरमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरची (Computer operator) नोकरी करतो. जमात-ए-इस्लामीचा सक्रिय सदस्य असलेला गुलाम याला परिमपोरा येथे हिंसक निदर्शनं केल्यानंतर पोलिसांनी 2009 मध्ये अटक केली व गुन्हे दाखल केले. तरुणांना दहशतवादी संघटनांत भरती होण्यासाठी चिथवण्याचं काम फुटिरतावाद्यांनी गुलामला दिलं होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. इस्लामिक स्टेटने जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये पाय पसरायचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांचा प्रचार करण्यात गुलाम आघाडीवर होता. गुलामने मुघीस याला दहशतवादी संघटनेत दाखल होण्यासाठी चिथावणी दिली होती आणि तो दहशतवादी झाला होता. मुघीस नंतर पोलीस एनकाउंटरमध्ये मारला गेला होता. सरकारी नोकरदाराचा बुरखा वापरून गुलाम दहशतवादी कारवाया करायचा. अर्शिद अहमद दास हा अवंतीपुरामध्ये शिक्षकाची नोकरी करतो. शिक्षक असूनही अर्शिद जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये सक्रिय होता. शिक्षकीपेशाच्या बुरख्याखाली तो हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना मदत करत होता. अवंतीपुरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force) जवानांवर दगडफेक करण्यासाठी आर्शिदने तरुणांना चिथवलं होतं. जमात-ए-इस्लामी आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्यासाठीही आर्शिद मदत करत होता. घराजवळ बसलेल्या नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सोडला श्वास कारमध्ये 10 हँडग्रेनेड आणि 2 चिनी पिस्तुलं सापडली बारामुल्लातील पोलीस कॉन्स्टेबल शाहिद हुसेन राठर याची पहिल्यांदा 2005 मध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलात एसपीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं लक्षात आल्यानंतर 2009 मध्ये त्याला निलंबित करण्यात आलं. 2011 मध्ये त्याला पुन्हा नोकरीत रूजू करून घेण्यात आलं आणि तो बढती मिळत 2013 मध्ये कॉन्स्टेबल झाला. पोलिसाच्या नोकरीच्या बुरख्याआडून शाहिद काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना शस्रास्र पुरवायचा. जून 2021 मध्ये शाहिद आपल्या दोन साथीदारांसोबत स्विफ्ट कारमधून जाताना पोलिसांनी त्याला उरीजवळ अडवलं तेव्हा त्याच्या कारमध्ये 10 हँडग्रेनेड आणि 2 चिनी पिस्तुलं सापडली होती. त्यानंतर त्याला अटक करून चौकशी केल्यावर अन्य 7 दहशतवाद्यांना पकडून मोठा शस्रसाठा जप्त करण्यात आला होता. कुपवाडातील आरोग्यविभागात नर्सिंग मदतनीस म्हणून काम करणारा शराफत अली खान सुरुवातीला 1998 मध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलात एसपीओ म्हणून नोकरीला लागला होता. नंतर तो आरोग्य विभागात नोकरीला गेला. त्याला या विभागात नोकरी कुणी दिली याबद्दल कोणतीच माहिती पोलिसांना मिळालेली नाही. सरकारी नोकरीच्या बुरख्याआड शफाअत दहशतवादी कारवाया करू लागला आणि त्याने बनावट भारतीय नोटा (Fake Indian Currency Notes) चलनात आणण्याचा प्रयत्न केला. बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांच्या चौकशीदरम्यान शफाअतचं नाव पोलिसांना पहिल्यांदा कळालं. कुपवाडात शफाअतविरुद्ध एफआयआर दाखल आहे. जून 2021 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल शाहिदला जेव्हा पोलिसांनी बारामुल्लामध्ये अटक केली तेव्हा त्यासोबत शफाअत होता. शफअतला 30 मार्च 22 पासून बडतर्फ करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकणाऱ्या या पाच सरकारी कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानातील कलम 311(2) (c) अंतर्गत बडतर्फ करण्याची शिफारस या समितीने केली.
  First published:

  Tags: Jammu and kashmir, Terrorism

  पुढील बातम्या