नवी दिल्ली 30 मार्च : सध्या देशभरात बाबर हत्याकांडाची चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये झालेल्या या बाबर हत्याकाडांचा तपास अत्यंत गांभीर्यानं करणार असल्याचं योगी सरकारनं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृत बाबर अली (Babar Ali Murder Case) याच्या आईचं स्वत: फोनवरून सांत्वन केलं आहे. मीही तुमच्या मुलासारखाच आहे, असा दिलासाही त्यांनी बाबर यांच्या आईला दिला आहे. कोणत्याही आरोपीला मोकळं सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाबरच्या कुटुंबीयांना दिलं. बाबरची पत्नी फातिमा यांच्या खात्यात जिल्हा प्रशासनानं त्वरित 2 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्याचबरोबर बाबरच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची नावंही रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. बाबरच्या कुटुंबीयांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. लागल्या होत्या पाच गोळ्या, पण सोडली नाही हिंमत; युक्रेनहून परतलेल्या हरजोतनं सांगितली थरकाप उडवणारी आपबिती आपलं संपूर्ण कुटुंब अजूनही दहशतीतच आहे, पण मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर आपल्याला थोडी हिंमत मिळाल्याचं बाबरच्या आईनं न्यूज 18 शी बोलताना सांगितलं. माझ्या मुलाला ज्याप्रकारे मारलं तसंच आरोपींनाही शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी बाबरच्या आईनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बाबरची विधवा पत्नी आणि त्याच्या मुलाविषयी त्यांनी काळजीही व्यक्त केली. बाबरच्या कुटुंबीयांना निश्चिंत राहण्याचं आवाहन आणि याप्रकरणी कडक कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे. मंगळवारी स्थानिक खासदाराचे प्रतिनिधी या नात्याने भाजपचे ब्लॉक प्रमुख शशांक दुबे यांनी बाबरच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना प्रशासकीय कामांची माहिती दिली. भाजप बाबरच्या कुटुंबीयांची पूर्ण काळजी घेणार असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तातडीच्या मदतीशिवाय अन्य कल्याणकारी योजनांचा फायदाही बाबरच्या कुटुंबीयांना मिळवून देणार असल्याचं दुबे यांनी स्पष्ट केलं. रामकोला पोलीस ठाणे परिसरातील कठघरही गावातील रहिवासी बाबरला भाजपचा प्रचार केल्याच्या आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मिठाई वाटल्याच्या कारणावरून पट्टीदारांनी प्रचंड मारहाण केली होती. त्यातच बाबरचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही आरोपी सध्या तुरुंगात आहेत. घराजवळ बसलेल्या नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सोडला श्वास या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रामकोला पोलीस ठाण्याचे प्रभारी, बीटचे इन्सपेक्टर आणि बीटचे शिपाई यांना हजर करण्यात आलं होतं. बाबरच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनानं बाबरची पत्नी फातिमा यांच्या बँक खात्यात 2 लाख रुपये जमा केले. शशांक दुबे यांनी बाबरच्या घरी जाऊन खात्यात 2 लाख रुपये जमा झाल्याची माहिती दिली आणि कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत देण्याचं आणि सर्व सरकारी योजनांचा लाभ देण्याचं आश्वासन दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.