श्रीनगर 5 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली 4 जी इंटरनेट(4G Internet In Jammu Kashmir) सेवा पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 रद्द (Article 370) करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंदीच्या काही दिवसांवनंतर हळूहळू यातील काही सुविधा सुरू करण्यास सुरूवात झाली होती.
जम्मू – काश्मीरचे योजना आयोगाचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी सांगितलं, की आता पूर्ण काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जम्मू काश्मीरमध्ये 2 जी इंटरनेट सेवा सुरू आहे. यापूर्वी राज्यात 4 जी इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सुरूवातीला याठिकाणी 2जी इंटरनेट सेवाही बंद होती. मात्र, सरकारनं 31 जानेवारी 2020 पासून 2जी सुविधा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात केवळ 301 साईट पाहाता येत होत्या. तसंच सोशल मीडियाचा वापरही करता येत नव्हता.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 4जी इंटरनेट सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांनी असंही म्हटलं होतं, की इंटरनेटच्या अभावामुळं लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आता जवळपास दीड वर्षानंतर जम्मू काश्मीरमधील 4जी इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Article 370, Internet, Jammu and kashmir