धक्कादायक! 4 वर्षांच्या चिमुरडीचा क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाच्या दंशाने मृत्यू

वडिलांसह ही चिमुरडी दिल्लीहून आपल्या गावी सुखरुप पोहोचली होती

वडिलांसह ही चिमुरडी दिल्लीहून आपल्या गावी सुखरुप पोहोचली होती

  • Share this:
    नैनीताल, 25 मे : उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. बेतालघाट जिल्ह्यातील 4 वर्षीय अंजना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिल्लीहून वडिलांसह सुखरुप गावी पोहोचली होती. मात्र क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. दिल्लीहून परतल्यानंतर या लहानग्या मुलीला गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मुलीला शाळेत सापाने दंश केल्याची माहिती मिळताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. वडिलांसह दिल्लीहून परतली होती अंजना तल्लीसेटी खौला गावातील तोकमध्ये राहणारे महेंद्र सिंह यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होता आणि लॉकडाऊनमुळे ते तेथे अडकले होते, लॉकडाऊन शिथिल होताच ते आपल्या गावी पोहोचले. गावातील लोकांनी कोरोनाच्या भीतीने त्यांना त्यांच्या कुटुंबासह शाळेत क्वारंटाईन केलं. काल सकाळी चार वर्षांची अंजना शाळेत होती आणि तिचे आई-वडील बाहेर होते. आत आल्यानंतर त्यांनी मुलीच्या कानाजवळ एक साप बसलेला पाहिला. त्यांनी कसंबसं सापापासून मुलीची सुटका केली. यानंतर मुलीच्या शरीरावर सापाने दंश केल्याचे निशाण पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने अंजनाला रुग्णालयात भरती केले. मात्र तिला वाचविण्यात आलं नाही. कुटुंबीयांनी यासाठी सरकारला दोषी ठरवलं आहे. सरकारने क्वारंटाईन सेंटरमध्ये काळजी घेतली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. हे वाचा -UP मध्ये 10 लाख कोरोनाबाधित? योगींच्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल  
    First published: