उत्तर प्रदेशात 10 लाखांहून अधिक कोरोनाबाधित? योगींच्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल

उत्तर प्रदेशात 10 लाखांहून अधिक कोरोनाबाधित? योगींच्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल

योगींनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेले 75 टक्के, दिल्लीतून आलेले 50 टक्के आणि इतर राज्यातून आलेल्या 25 टक्के मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वेबिनारमध्ये विविध राज्यातून आलेल्या मजुरांबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. यावेळी योगी म्हणाले की, 25 लाख स्थलांतरित मजूर विविध राज्यांमधून उत्तर प्रदेशात परतले. मुंबईतून आलेले 75 टक्के आणि दिल्लीतून आलेल्या 50 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय विविध राज्यांमधून आलेले 25 ते 30 टक्के मजुरांमध्ये इतर आजार आढळून आले आहेत, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. यावर प्रियांका गांधी यांनी ट्विट करीत प्रश्न उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यात संसर्ग रोखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी सांगितले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेले 75 टक्के, दिल्लीतून आलेले 50 टक्के आणि इतर राज्यातून आलेल्या 25 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत साधारण 25 लाख नागरिक उत्तर प्रदेशात परतले आहेत. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला आहे. जर मुख्यमंत्रीचे वक्तव्य खरे असेल तर उत्तर प्रदेशात 10 लाख कोरोनाबाधित आहेत? राज्य सरकार तर केवळ 6227 सांगत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारने पूर्ण पारदर्शकतेने चाचणी, संक्रमणाचा डेटा आणि तयारी जनतेसोबत शेअर करावी. आणि संक्रमण रोखण्यासाठी सरकार काय तयारी करीत आहे याबाबत माहिती द्यावी, अशाआशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

First published: May 25, 2020, 11:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading