3rd Wave of Coronavirus: कधी येणार कोरोनाची तिसरी लाट? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) ओसरत असून तिसऱ्या लाटेचा (3rd wave) धोका वाढत आहे. कोरोना विषाणूची तिसरी लाट अत्यंत घातक असून याचा संसर्ग रोखणं अशक्य असल्याचा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी दिला आहे.

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) ओसरत असून तिसऱ्या लाटेचा (3rd wave) धोका वाढत आहे. कोरोना विषाणूची तिसरी लाट अत्यंत घातक असून याचा संसर्ग रोखणं अशक्य असल्याचा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी दिला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 जून: मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona cases) घट होत आहे. देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) ओसरत असून तिसऱ्या लाटेचा (3rd wave) धोका वाढत आहे. पुढील 6 ते 8 आठवड्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी दिला आहे. सध्या देशात अनलॉक (Unlock) प्रक्रिया राबवली जात असून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून नागरिकांनी कोणताही धडा घेतला नसल्याचंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. पण सध्या देशातील अवघ्या 5 टक्के लोकांचं लसीकरण पुर्ण झालं आहे. त्यामुळे देशाला तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असून कोरोना संसंर्ग रोखणं अवघड आहे. यावेळी गुलेरिया यांनी कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबतही भाष्य केलं आहे. अंतर वाढवणं चुकीचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येणार असल्याचंही रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमांचा फज्जा  उडवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून नागरिकांनी कोणताच धडा घेतला नसल्याचं मतही गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. कोरोना लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच नागरिकांनी  गर्दी करायला सुरू केली आहे. याचा मोठा फटका देशाला बसू शकतो. हेही वाचा-संसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी? काय सांगतात तज्ज्ञ कोरोना विषाणूची तिसरी लाट देशात सर्वसाधारणपणे तीन महिन्यासाठी असेल. मात्र, वेगवेगळ्या फॅक्टर्सनुसार हा कालावधी कमीही असू शकतो. कोरोना नियमांचं पालन करणं सक्तीचं आहेच. पण तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. अनलॉक केलं म्हणजे कोरोना संपला असा याचा अर्थ होतं नाही. मागच्या वेळी देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट आला होता. संबंधित व्हेरिएंट आपल्याकडे विकसित झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: