राजकुमार सिंह, प्रतिनिधी वैशाली, 8 जुलै : ताप आल, सर्दी झाली, खोकला झाला की आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. आपले परिसरातील एक ठरलेले डॉक्टर असतात. परंतु तुम्ही कधी डॉक्टरांच्या गावाबद्दल ऐकलंय? जिथे केवळ डॉक्टरच राहतात. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील चकमसूद गावात एकूण 30हून अधिक डॉक्टर राहतात, तेही आयुर्वेदिक. 1200 लोकसंख्येच्या या गावात 80 टक्के लोक गावातच उपचार करून घेतात. विशेष म्हणजे गावातील एकही डॉक्टर रुग्णांकडून फी घेत नाही. पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. केवळ औषधांचे पैसे द्यावे लागतात. परिणामी गावात अगदी सुदृढ वातावरण आहे.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, गावातील अयोध्या प्रसाद नामक व्यक्ती कोलकाताला शिक्षणासाठी गेले होते. गावात परतताच त्यांची शिक्षकपदी नियुक्ती झाली. ते मुलांना शिकवू लागले. मात्र दुपारी शाळा झाल्यानंतर संध्याकाळी ते आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कार्यरत असत. शिवाय शाळेतील विद्यार्थ्यांनाही अधूनमधून वैद्यकीय धडे देत असत. अयोध्या प्रसाद यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील तरुणांनी वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. Pet lovers…आता तुमचा खिसा खाली होणार; लायसन्स घ्यावं लागणार! अयोध्या प्रसाद यांचे पुतणे डॉ. सतीश प्रभाकर यांनी सांगितलं की, ‘माझे वडील हाजीपूरमध्ये प्राध्यापक होते. जेव्हा काकांचं वय झालं, तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना नोकरी सोडायला सांगून आयुर्वेदिक डॉक्टरकीचे धडे घ्यायला लावले. त्यानंतर माझ्या वडिलांनीही अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलं. हळूहळू गावातील इतर लोकही त्यांच्यासोबत काम करू लागले. आज आमच्या क्लिनिकमधून जवळपास 15 ते 20जण डॉक्टर झाले आहेत.’ दरम्यान, या गावातील हे सुशिक्षित वातावरण पाहून सर्वजण भारावून जातात. गावाचं सर्वत्र कौतुक होत आहे.