डेहराडून, 05 ऑक्टोबर : उत्तराखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये 45 ते 50 लोकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस लालढांगहून काडा तल्ला इथं जात होती. बिरोखाल येथील सीमडी बँडजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. ( Jalgaon Crime : अजमेरचा बाबा पावत असल्याचे सांगून दाम्पत्याने लाखो रुपये लुटले ) या बसमध्ये 40 ते 50 वऱ्हाडी सामील होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. रात्रभर बचावकार्य सुरू होतं.
Uttarakhand: 25 people dead in Pauri Garhwal bus accident
— ANI Digital (@ani_digital) October 5, 2022
Read @ANI Story | https://t.co/mAmzcqP8Xu
#Uttarakhand pic.twitter.com/YvlOeP3sIB
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आपात्कालीन विभागाच्या केंद्रावर पोहोचले. घटनास्थळी SDRF ची पाठवण्यात आली. सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पुष्कर सिंह धामी यांनी दिली. मुंबईत वरळी सी लिंकवर भीषण अपघातात 5 ठार दरम्यान, मुंबईतही भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वरळी सी लिकवर थांबण्यास मनाई आहे असे असताना काही गाड्या सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या कारने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 6 जण जखमी आहेत. यामध्ये जखमींमधील तिघांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Mumbai Worli Accident : मुंबईत सी लिंकवर भीषण अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल) वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात भीषण पद्धतीने झाला आहे दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे