जाहिरात
मराठी बातम्या / देश / ATM दुरुस्तीच्या नावाने आले अन् 22 लाख लुटून नेले! ओळखू येऊ नये म्हणून असा रचला कट

ATM दुरुस्तीच्या नावाने आले अन् 22 लाख लुटून नेले! ओळखू येऊ नये म्हणून असा रचला कट

ATM दुरुस्तीच्या नावाने आले अन् 22 लाख लुटून नेले! ओळखू येऊ नये म्हणून असा रचला कट

कॅनरा एटीएमच्या आजूबाजूला काम करणाऱ्या कामगारांना आणि लोकांना त्यांनी एटीएम मेकॅनिक असल्याचे सांगितले.

  • -MIN READ
  • Last Updated :

हाजीपूर, 9 जुलै : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये (Hajipur) अशी घटना घडली की, ज्यावरुन येथील गुन्हेगारांचे मनोबल मोठे आहे, असेच म्हणावे लागेल. कारण इथे भरदिवसा कॅनरा बँकेच्या एटीएममधून (Canara Bank ATM Loot) सिनेस्टाईल पद्धतीने तब्बल 22 लाख रुपयांची लूट (ATM Loot) केली आहे. ही घटना येथील हरप्रसाद चौकमध्ये घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण -  एटीएम मेकॅनिक असल्याचे भासवून आलेल्या दोन दरोडेखोरांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यावर शटर बंद केले होते. यानंतर त्यांनी आपला डाव साधला. दरम्यान, माहिती मिळताच वैशालीचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनीष, एसडीपीओ महुआ पूनम केसरी आणि अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लुटलेल्या रकमेबाबत अधिकृत दुजोरा नाही. मात्र, एटीएममध्ये सुमारे 22 लाख रुपये होते, जे दरोडेखोरांनी लुटून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दोन गुन्हेगार आले होते. कॅनरा एटीएमच्या आजूबाजूला काम करणाऱ्या कामगारांना आणि लोकांना त्यांनी एटीएम मेकॅनिक असल्याचे सांगितले. या एटीएममध्ये काही अडचण निर्माण झाली आहे, ती दूर करण्यासाठी ते आले आहेत. असे सांगून या दरोडेखोरांनी एटीएमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. काही मिनिटांतच दोघांनी एटीएममध्ये ठेवलेले पैसे लुटून तेथून पळ काढला. दरोडेखोरांनी सोबत बॅग आणली होती. त्याच बॅगेत पैसे भरल्यानंतर ते फरार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा -  ऑनलाईन ऑर्डर पडली महागात, Google Pay वरुन टाकले 5 रुपये अन् बसला लाखोचा फटका महुआचे एसडीपीओ पूनम केसरी यांनी सांगितले की, आम्हाला घटनेबाबत माहिती मिळाली होती. प्राथमिक तपासात एक व्यक्ती एटीएम मेकॅनिक असल्याचे भासवून शटर बंद करून एटीएममध्ये ठेवलेले पैसे घेऊन गायब झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. किती रक्कम लुटली गेली, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. हे तपासानंतरच कळेल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , bihar , crime news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात