यवतमाळ : सध्या ऑनलाईनचा (Online) जमाना आहे. त्यामुळे अनेक जण ऑनलाईनच्या माध्यमातूनच खरेदी विक्री करतात. मात्र, यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करुन एका व्यक्तीला फसविल्याची घटना घडली. (Online Fraud in Yawatmal) किराणा व्यावसायिकाला ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
धामणगाव रोड येथे राहणारे मयूर इसरानी यांचे स्टेट बँक चौक परिसरात किराणा दुकान आहे. शनिवारी दुपारी त्यांना एक भयानक अनुभव आला. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्यांचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरुन त्यांनी पाच रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर लगेचच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेतला आणि त्यांच्या तीन बँकेतील खात्यातून तब्बल 1 लाख 85 हजार रुपये काढून घेतले.
आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांचे लक्षात आले. (Online Fraud with Kirana Shop Owner) यानंतर लगेचच त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फसवणुकीची तक्रार दिली.
शहरात सातत्याने घडतातेय अशा घटना -
दरम्यान, यवतमाळ शहरात सातत्याने ऑनलाईन खरेदीच्या व्यवहारात बॅंक खात्यातून पैसे लुटले जात आहेत. मोबाईलचा ॲक्सेस घेऊन ठगबाजांकडून पैसे काढून घेतले जातात. मागील आठवडाभरातील ही फसवणुकीची सातवी घटना आहे. तर मागील 6 घटनांच्या माध्यमातून तब्बल यातून 13 लाख 16 हजार रुपयांची रोख रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - ATM Alert : सावधान! मृत व्यक्तीचं एटीएम कार्ड वापरून पैसे काढता का? जावं लागेल तुरुंगात; जाणून घ्या नियम
कस्टमर केअरसोबत संपर्क करुन फसवणूक होत आहे. ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातूनही ठगबाज बँक खात्यातील रक्कम काढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Online shopping, Yawatmal