मराठी बातम्या /बातम्या /देश /फुटबॉल मॅच पाहायला गेले अन् जाळ्यात अडकले; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह दोघांना कंठस्नान

फुटबॉल मॅच पाहायला गेले अन् जाळ्यात अडकले; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह दोघांना कंठस्नान

अब्बास शेख लष्कर-ए-तोयबाचा लढाऊ गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचा (The Resistance Front) स्वयंघोषित म्होरक्या होता तर त्याचा सेकंड-इन-कमांड साकीब मंजूर स्वतःला लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर (District Commander) म्हणवत असे

अब्बास शेख लष्कर-ए-तोयबाचा लढाऊ गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचा (The Resistance Front) स्वयंघोषित म्होरक्या होता तर त्याचा सेकंड-इन-कमांड साकीब मंजूर स्वतःला लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर (District Commander) म्हणवत असे

अब्बास शेख लष्कर-ए-तोयबाचा लढाऊ गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचा (The Resistance Front) स्वयंघोषित म्होरक्या होता तर त्याचा सेकंड-इन-कमांड साकीब मंजूर स्वतःला लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर (District Commander) म्हणवत असे

    श्रीनगर 24 ऑगस्ट : अनेक राजकीय नेत्यांच्या आणि नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर ए तोयबाच्या (Lashkar- e -Taiba) अब्बास शेख (Abbas Sheikh) आणि साकिब मंजूर (Saqib Manzoor) या दोन मोस्ट-वॉन्टेड दहशतवाद्यांना (Terrorist) कंठस्नान घालण्यात जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराला यश आलं आहे. सोमवारी श्रीनगरच्या (Srinagar) अलोची बाग (Alochi Bag) भागात झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाले.

    हे दोघेही स्थानिक संघांदरम्यान होणारे फुटबॉल सामने (Soccer Matches) पाहण्यासाठी अलोची बाग येथील खाड फॅक्टरी मैदानावर (Khad Factory Ground) येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अत्यंत गुप्तपणे त्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. अगदी मोजक्या पोलीस आणि लष्कर अधिकाऱ्यांनाच या मोहिमेची माहिती देण्यात आली होती. गेले काही दिवस पोलीस यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते.

    दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

    कुलगामचा रहिवासी असलेला अब्बास शेख लष्कर-ए-तोयबाचा लढाऊ गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचा (The Resistance Front) स्वयंघोषित म्होरक्या होता तर त्याचा सेकंड-इन-कमांड साकीब मंजूर, स्वतःला लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर (District Commander) म्हणवत असे. या दोघांचा श्रीनगरमधील वकील बाबर कादरी यांच्या हत्येमध्येही सहभाग होता. गेल्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. हे दोघेही तरुणांचे ब्रेनवॉश करून दहशतवादी होण्यास प्रवृत्त करत असत. त्यासाठीच ते फुटबॉल मैदानावर मॅच बघण्याचा बहाणा करून आले होते.

    या दोन घातकी दहशतवाद्यांना पोलीस आणि लष्कराच्या तुकडीनं घेरल्यानंतर आत्मसमर्पण करण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती, पण त्यांनी गोळीबार सुरू केल्यानं पोलीस आणि लष्करानंही प्रत्युत्तर दिलं. त्यात हे दोघेही ठार झाले. यात लष्कर किंवा पोलीस तसेच नागरिकांना कोणतीही हानी पोहोचली नसल्याचे सूत्रांनी कळवले आहे.

    पोलिसांनी याबदद्लची माहिती कुणालाच दिली नव्हती. जरी फुटबॉलच्या स्टेडियममध्ये हे ऑपरेशन होणार होतं तरीही सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची आधीच काळजी सुरक्षा दलांनी घेतली होती. त्यानुसार हे दोन दहशतवादी तिथं आल्यानंतर ऑपरेशन सुरू करण्यात आलं. त्यामध्ये ते मारले गेले.

    पंतप्रधानांचा चाहता! भेटण्यासाठी करतोय चक्क श्रीनगर ते दिल्लीपायी प्रवास

    हे दोन्ही दहशतवादी तरुणांना हेरण्याचं काम करत होते. तरुण निवडून त्यांचा ब्रेन वॉश करणं आणि त्यांना भारताविरुद्ध काम करण्यास प्रवृत्त करणं तसंच त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी प्रोत्साहित करणं असं काम हे दोघं करायचे. दहशतवादी संघटनांचं प्रशिक्षण घेतल्यावर हे तरूण दहशतवादी म्हणून पुन्हा भारतात जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. पण सुरक्षा दलांनी या दोघांना कंठस्नान घातलं.

    First published:

    Tags: Jammu kashmir, Srinagar, Terrorist