मराठी बातम्या /बातम्या /देश /

BIG NEWS : पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या ढेर, पाहा VIDEO

BIG NEWS : पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या ढेर, पाहा VIDEO

: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत  (2 terrorist killed by India security forces in Kashmir) झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

  • Published by:  desk news

श्रीनगर, 17 ऑक्टोबर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत  (2 terrorist killed by India security forces in Kashmir) झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यात लष्कर-ए-तैयब्बाचा (Umar Musktak Khande dead) दहशतवादी उमर मुश्ताक खांडे याचादेखील समावेश आहे. लष्कराने दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारुगोळा जप्त केला आहे.

लष्कराला मोठं यश

जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या आणि दहशतवादी उमर मुश्ताक खांडे मारला गेला आहे. उमर हा अत्यंत दगाबाज दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. उमरला टिपणे हे भारतीय लष्कराचं मोठं यश मानलं जात आहे. आठ तास ही चकमक सुरू होती. या चकमकीत मारल्या गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

मुश्ताक होता वॉण्टेड

दहशतवादी उमर मुश्ताक खांडेनं भारतीय सैनिकांवर बेसावध असताना हल्ला केला होता. काश्मीर पोलिसांत सेवा करणारे मोहम्मद युसुफ आणि सुहैल आह हे चहा पित असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांचे प्राण घेतले होते. या घटनेनंतर मुश्ताकला धडा शिकवण्यासाठी जवान सज्ज होते. रविवारी झालेल्या चकमकीवेळी त्यीं उमर मुश्ताकला टिपून एक प्रकारे आपल्या शहीद सैनिकांनाच मानवंदना दिल्याची चर्चा होती.

हे वाचा - भारत विक्रमी 100 कोटी लसीकरणाच्या अगदी जवळ; या आठवड्यात घडेल इतिहास

काश्मीरमधील कारवायांमध्ये वाढ

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय होत असल्याची लक्षणं गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहेत. काही तासांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील बिहारी कामगारांवरदेखील भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यात दोन कामगार मृत्यूमुखी पडले होते. त्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन पाठवून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आले होते. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतवून लावले होते. या चकमकीत लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या मारला गेल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Jammu kashmir, Terror acttack