बरेली, 16 जुलै : नाथ नगरी बरेली येथील शंकराच्या मंदिरांचे वेगवेगळे रहस्य आहेत आणि त्या प्रत्येक मंदिराची वैशिष्ट्ये देखील वेगळी आहेत. नाथनगरीत शंकराची सात मंदिरे असल्याने बरेलीला नाथ नगरी असे म्हणतात. या सात मंदिरांपैकी एक मदिनाथ मंदिर असून हे मंदिर सुभाषनगर परिसरात बांधले आहे. मढ़ीनाथ मंदिरात जाण्यासाठी अतिशय अरुंद गल्ल्यांतून वाट काढावी लागते. प्राचीन मंदिरात सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीसाठी भाविकांची वर्दळ असते. मढ़ीनाथ मंदिराचा इतिहास फार जुना असून विशेषत: श्रावण महिन्यात मंदिरात भक्तांची अधिक गर्दी जमते. आख्यायिकेनुसार, एका तपस्वीने ये-जा करणाऱ्यांची तहान भागवण्यासाठी येथे विहीर खोदण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर विहीर खोदत असताना येथे शिवलिंग प्रकट झाले आणि त्या शिवलिंगावर मणिधारी नाग लपेटला होता. ज्यालापाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर येथे मंदिराची स्थापना करण्यात आली आणि मंदिराचे नाव मढ़ीनाथ ठेवण्यात आले. मंदिराच्या पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हा नाग येथील शिवलिंगाचे रक्षण करतो आणि 1960 पर्यंत या विहिरीतून दूध येत होते.
5 आणि 7 पानाच्या बेलपत्राचा व्हिडिओ झाला व्हायरल, भाविक म्हणाले, हा तर भगवान शंकराचा चमत्कार मंदिराचे महंत प्रेम गिरी यांच्या सांगण्यानुसार, हे मंदिर सुमारे 800 वर्षे जुने आहे. या मंदिराची कीर्ती दूरवर पसरल्यामुळे येथे खूप दुरून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे पूर्ण नाव दुधाधारी मदिनाथ मंदिर असल्याचे त्यांनी सांगितले. महंत म्हणाले की, विशेषत: शिवरात्रीला येथे गर्दी असते. नाथ नगरीचे मंदिर असल्याने येथील प्रशासनाचे विशेष सहकार्य आहे. स्थानिक रहिवासी अभिषेक त्यागी यांनी सांगितले की ते बऱ्याच वर्षांपासून या मंदिरात येतात आणि हे मंदिर नाथ नगरीचे मुख्य मंदिर मानले जाते. येथे येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते.