मराठी बातम्या /बातम्या /देश /

Terrorist Active: खोऱ्यात 199 दहशतवादी सक्रिय, यावर्षी 151 दहशतवाद्यांचा खात्मा

Terrorist Active: खोऱ्यात 199 दहशतवादी सक्रिय, यावर्षी 151 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist) कारवाया सुरूच आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist) कारवाया सुरूच आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist) कारवाया सुरूच आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 25 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist) कारवाया सुरूच आहेत. सध्या काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) सुमारे 199 दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलानं बुधवारी यासंदर्भातली माहिती दिली आहे. यातील 110 दहशतवादी स्थानिक तर 89 परदेशी आहेत. काश्मीर खोऱ्याशी संबंधित अनेक गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा हवाला देत एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, खोऱ्यात एकूण 199 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यात 110 स्थानिक आणि 89 परदेशी आहेत.

आतापर्यंत 148 दहशतवाद्यांचा खात्मा

या वर्षी 24 नोव्हेंबरपर्यंत, खोऱ्यात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्करासोबत झालेल्या चकमकीत 148 दहशतवादी मारले गेले आहेत," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यापैकी 127 स्थानिक तर 21 परदेशी आहेत. पुढे अधिकाऱ्यानं म्हटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात CRPF चे जवान तैनात करण्यात आले आहेत. खोऱ्यात सुमारे 65,000 CRPF जवान तैनात आहेत. याशिवाय खोऱ्यातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या अतिरिक्त 25 कंपन्याही तेथे तैनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-  राज्यात Corona शी खेळ, लोकांच्या निष्काळजीपणामुळे तिसऱ्या लाटेला आमंत्रण?

11 जवान शहीद

CRPF च्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यावर्षी दहशतवाद्यांशी लढताना एकूण 11 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. गेल्या सात दिवसांत एकूण 27 डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांना पकडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये छत्तीसगडमधून 13, बिहारमधून 3 आणि झारखंडमधून 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

TRF कमांडरसह 3 ठार

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 'द रेझिस्टन्स फ्रंट'च्या टॉप कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले. बुधवारी संध्याकाळी रामबाग परिसरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ट्विट केले की, पोलिसांनी श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केले. मारले गेलेले दहशतवादी आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते याची ओळख पटवली जात आहे.

हेही वाचा- भरधाव ट्रकची दोन विद्यार्थिनींसह दुकानदाराला धडक, घटनेचा Live Video

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव TRF कमांडर मेहरान यासीन शाला असे आहे. जो श्रीनगरमधील नागरिकांच्या हत्येत सहभागी होता. त्याचा मृत्यू हा श्रीनगरमधील दहशतवाद्यांना मोठा धक्का आहे. या घटनेनंतर श्रीनगरच्या विविध भागातून बंद आणि निदर्शने केल्याच्या बातम्या येत आहेत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Terrorist, Terrorists