02 सप्टेंबर : मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या दोषींच्या पुनर्विचार याचिकेसंबंधी सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमन व अन्य कैद्यांनी शिक्षेसंदर्भात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकांची सुनावणी खुल्या कोर्टात करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. या पुनर्विचार याचिकांची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमन, दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी मोहम्मद आरिफ यांच्यासह अन्य दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवर तीन न्यायमूर्ती यांच्या खंडपीठात खुल्या कोर्टात सुनावणी व्हावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यापूर्वी मृत्यूदंडाच्या पुनर्विचार याचिकांवरन्यायमूर्ती यांच्या चेंबरमध्ये सुनावणी व्हायची. सुप्रीम कोर्टाने चार-एकच्या बहुमताने हा निर्णय सुनावला. या याचिकांवर खुल्या कोर्टात सुनावणी होणं हा संबंधित याचिकाकर्त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं कोर्टाने म्हटलंय. इतकंच नाही तर ज्या याचिका यापूर्वी फेटाळण्यात आल्या आहेत पण, फाशी अजून झालेली नाही, ते नव्यानं पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++