जाहिरात
मराठी बातम्या / देश / I HATE YOU PAPA लिहून 11वीच्या विद्यार्थिनीचं भयानक पाऊल, म्हणाली...

I HATE YOU PAPA लिहून 11वीच्या विद्यार्थिनीचं भयानक पाऊल, म्हणाली...

I HATE YOU PAPA लिहून 11वीच्या विद्यार्थिनीचं भयानक पाऊल, म्हणाली...

11 वीच्या विद्यार्थिनीने भयानक निर्णय घेतला.

  • -MIN READ Local18 Gujarat
  • Last Updated :

धोराजी, 12 मार्च : देशात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरात राज्याच्या धोराजी शहरातील रॉयल स्कूलमधील 11 वीच्या विद्यार्थिनीने शनिवारी रात्री आत्महत्या केली. दिव्या असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सायन्सची विद्यार्थिनी होती. तिचा मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. रात्री बाराच्या सुमारास काही मुलींनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर न मिळाल्याने शंका आल्याने वसतिगृह व्यवस्थापनाला कळविण्यात आले. यानंतर वसतिगृहाच्या सुरक्षा पथकांन खोलीत प्रवेश केला, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं - दरम्यान, या विद्यार्थिनीच्या खोलीतून सुसाईड नोट सापडली आहे. यात लिहिलंय की, - आय हेट यू पापा, जोपर्यंत प्रत्येक अश्रूचा बदला नाही घेत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन. मला क्षमा करा. मी इतके टेन्शन घेऊन जगू शकत नाही. स्टडी टेबलावरूनच दिव्याच्या हस्ताक्षरात सुसाईड नोट मिळाली. पुढे यात लिहिलं होतं की, “खरंच बाबा, माझ्या मृत्यूचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तू. मी तुमचा खूप तिरस्कार करते कारण, तूम्ही मला कधीच आपली मुलगी मानली नाही. फक्त आदेश दिले आणि रागावले. माझ्या मरणामागे मला फक्त ‘बा’ (आजी) साठी दु:ख आहे. ज्यांनी मला आई-वडील दोघांचे प्रेम दिले. सॉरी आजी.” सूनेला घेऊन सासरा फरार, 1 महिना झाला तरी पत्ता नाही; मुलगा म्हणतो…

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनी दिव्याचे कुटुंब मूळचे गुजरातमधील कुतियाना शहरातील आहे. दिव्या दहावीपासून धोराजी येथील रॉयल स्कूलमध्ये शिकत असून त्याच शाळेच्या वसतिगृहात राहायची. दिव्याचे वडील रमेशभाई हे बीएसएफमध्ये शिपाई राहिले आहेत. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच तेही वसतिगृहात पोहोचले होते.

दरम्यान, पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर सुसाईड नोटचे हस्ताक्षर तपासण्यासाठी ही चिठ्ठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात