लखेश्वर यादव, प्रतिनिधी छत्तीसगड, 27 एप्रिल : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा मनाने किती मोठा असू शकते याचे उदाहरण नुकतेच पाहण्यास मिळाले. छत्तीसडमधील जांजगीर येथील चांपामध्ये 11 शेतकऱ्यांनी महामार्गासाठी आपली शेती दान केली आहे. एवढंच नाहीतर या शेतकऱ्यांनी जमिनीच्या बदल्यात मिळणारी रक्कम सुद्धा नाकारली आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. जांजगीर नैला येथील 11 शेतकऱ्यांनी आपली जमीन ही 1 किलोमिटर मार्गासाठी आपली शेती दान केली आहे. नैला-बलौदा मुख्य मार्गावरून जांजगीर बिलासपूर मुख्य मार्गापर्यंत बायपास तयार केला जात आहे. यासाठी जमिनीचं सर्वेश्रण करण्यात आले होते. पण, आपल्या परिसरात रस्ता होत असल्याचा आनंद शेतकऱ्यांना होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जमीन देण्याचा एकत्र निर्णय घेतला. (Success Story : मुलगी आहे म्हणून बँकेची कर्ज देण्यास टाळाटाळ, आज तीच बनली राज्याची आदर्श) हा बायपास तयार झाल्यामुळे अनेक गावांपर्यंत जाण्यासाठी आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांचं हित पाहता जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाला सुद्धा कळवलं. शेतकऱ्यांचा हा निर्णय ऐकून प्रशासकीय अधिकारीही भारावून गेले. त्यांनी या शेतकऱ्यांना मोबदला देणार असल्याचंही सांगितलं. पण शेतकऱ्यांनी मोबदला घेण्यास नकार दिला. (OMG! राजकुमारची 18 लाखांची आलिशान गाडी गाढवांनी ‘पळवली’; नेमकं प्रकरण काय पाहा VIDEO) विशेष म्हणजे, 1 फूट जमीन देण्यासाठी शहरातील लोक मागेपुढे पाहतात. पण या परिसरातील 11 शेतकरी आदर्श ठरले आहे. आज या सर्व 11 शेतकऱ्यांना सहमती पत्र देण्यात आले आहे. बायपास मार्गासाठी दिलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना ही पत्र देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात येण्या-जाण्यासाठी प्रशस्त असा बायपास तयार होणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषी अधिकारी ब्यास कश्यप यांनी दिली. या शेतकऱ्यांनी दिली जमीन भूस्वामी विधानसभा नेते प्रतिपक्ष नारायण चंदेल यांच्यासह रामकुमार, जंगीराम चंदेल, धीरज, पवन, शंकर शकुंतला, राजाराम, बलीराम शैलेंद्र, विष्णु प्रसाद, संतोष कुमार, पुरुषोत्तम भगवानी , हेमंत, बसंत, महेश राम, लखेसर, जगन्नाथ प्रसाद, जगन्नाथ प्रसाद, गोवर्धन, अवधराम या शेतकऱ्यांनी आपली जमीन दान केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.