जाहिरात
मराठी बातम्या / देश / Success Story : मुलगी आहे म्हणून बँकेची कर्ज देण्यास टाळाटाळ, आज तीच बनली राज्याची आदर्श

Success Story : मुलगी आहे म्हणून बँकेची कर्ज देण्यास टाळाटाळ, आज तीच बनली राज्याची आदर्श

bihar success story

bihar success story

तू मुलगी आहेस भविष्यात तुझे लग्न होणार आहे. तु सासरी गेल्यास तुझ्या व्यवसायाचे काय होणार असे अनेक प्रश्न विचारत बँकेने मुलीला व्यवसायासाठी पैसे दिले नाहीत.

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

सच्चिदानंद (पाटणा), 27 एप्रिल : सध्या मुले आणि मुली यांच्यात भेदभाव राहिला नाही. यामुळे मुलांच्या बरोबरीने मुलीही सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत. परंतु अद्यापही काही ठिकाणी मुलींना मुलांच्या बरोबरीने वागणूक देत असल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. एका मुलीला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची गरज होती यावेळी बँकेने तिला मुलगी असल्याने कर्ज देण्यास पहिल्यांदा नकार दिला.

जाहिरात

तू मुलगी आहेस भविष्यात तुझे लग्न होणार आहे. तु सासरी गेल्यास तुझ्या व्यवसायाचे काय होणार असे अनेक प्रश्न विचारत बँकेने मुलीला व्यवसायासाठी पैसे दिले नाहीत. परंतु त्या मुलीने हार न मानता कष्ट करत आपला स्व:ताचा व्यवसाय उभारला आहे. यामुळे तिचं बिहारमध्ये कौतुक होत आहे.

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून चहाचा गाडा टाकला अन् 20 दिवसांत केली क्रांती PHOTOS

पाटणाच्या पटेल नगरमध्ये राहणाऱ्या रश्मीने 2018 मध्ये NIFT पाटणा येथून फॅशन डिझायनिंगची पदवी पूर्ण केली. यानंतर तिने स्टार्टअप “Dhajcraft” नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. बिहारपासून ते दिल्लीपर्यंत ब्रँड पोहोचवण्याची योजना आखली.

दरम्यान रश्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला लहानपणापासून स्केचिंगची आवड होती. यामुळे मी माझे शिक्षण त्याच पद्धतीने करत राहिल्याचे ती म्हणते. ती घडत असताना तिच्या घरच्यांचा नेहमीच पाठिंबा राहिले आहे.

जाहिरात

तिच्या इच्छेनुसार तिने 2018 मध्ये NIFT मधून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतली. यानंतर त्यांनी कंपनीत काम करण्याऐवजी स्वतःची कंपनी सुरू केली. यामध्ये ती महिलांच्या सुंदर दिसण्याच्या सगळ्याच वस्तूंची निर्मीती या कंपनीत केली जाते.

या क्षेत्रात येण्यापूर्वी रश्मीने सुरुवातीला पाटणा मार्केटचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात फुटवेअरच्या डिझायनची कमतरता असल्याचे जाणवले. अशा परिस्थितीत रश्मीने डिझायनर फुटवेअर बनवून बाजारात आणण्याची योजना आखली. यातून तिने लेडीज आणि जेंट्स चप्पल बाजारात आणलं आहे.

जाहिरात
दीड एकर शेतीमध्ये केला नवा प्रयोग, दुष्काळी भागातील शेतकरी झाला लखपती! Video

रश्मीने दिलेल्या माहितीनुसार, तीला व्यवसाय मोठा करण्यासाठी बँकेकडे पैशाची मागणी केली परंतु तिथे तिला काही अडथळे आले. शेवटी तिला बँकेकडूनच पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज मिळाले परंतु यामध्ये तिला मोठा संघर्ष करावा लागला. या मुलीने जिद्दीने काम करत अल्पावधीतच बँकेचे कर्ज कमी करत आली आहे. सध्या यामुलीने तिच्या कंपनीत 10 कुशल कारागिरांना काम दिले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात