Home /News /national /

साहेब, आम्हाला वाचवा! वीज कोसळून जखमी झालेल्या नागरिकाचा पोलिसांना फोन, मृतदेहांचा खच पाहून सरकली पायाखालची जमीन

साहेब, आम्हाला वाचवा! वीज कोसळून जखमी झालेल्या नागरिकाचा पोलिसांना फोन, मृतदेहांचा खच पाहून सरकली पायाखालची जमीन

पहिल्या पावसात वीज कोसळून 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे.

    जयपूर, 12 जुलै: नैसर्गिक संकट (Natural calamity) जेव्हा कोसळतं, तेव्हा काही क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो. पहिल्या पावसात वीज (lightning) कोसळून 11 जणांचा जागीच मृत्यू (11 dead) झाल्याच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. ही दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली जयपूरमध्ये (Jaipur). मान्सूनच्या पहिल्याच पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक नागरिक आमेर किल्ल्यावर (Amer Fort) गेले होते. या किल्ल्यासमोर असणाऱ्या 500 मीटर उंचीच्या टॉवरवर अचानक वीज कोसळली आणि क्षणार्धात अनेकांना आपल्या जिवाला मुकावं लागलं. या घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण सध्या मृत्युशी झुंज देत आहेत. तो फोन आला आणि पोलीस धावले वीज कोसळल्यानंतर आमेर किल्ल्यावर हजर असणारे सगळेच जमिनीवर कोसळले. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर इतर काहीजणांना काही वेळाने शुद्ध आली. काय घडलंय, याची जाणीव झाल्यानंतर एका नागरिकाने पोलीस स्थानकात फोन केला आणि आपल्याला मदत करण्याची विनंती केली. पोलिसांनी तातडीनं किल्ल्याकडे धाव घेत मदकार्य सुरू केलं. मोबाईल फ्लॅशमध्ये मदतकार्य पोलीस जेव्हा किल्ल्यावर पोहोचले तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. नेमकं काय घडलंय, याची कल्पना अंधारात येत नसली, तरी त्यांनी मोबाईलमधील टॉर्चच्या मदतीनं शोधकार्य सुरु केलं. काही वेळातच SDRF ची टीमदेखील मदतीसाठी हजर झाली. त्यानंतर जेव्हा ड्रॅगन लाईट लावण्यात आले, तेव्हा मात्र सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. किल्ल्यावर इतस्ततः माणसं विखरून पडली होती. त्यातील काहीजण निपचित पडले होते, काहीजण विव्हळत होते, तर काहीजण उठण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील जे जिवंत होते, त्यांना SDRF च्या टीमनं तत्काळ कृत्रिम ऑक्सिजन देऊन शुद्धीत आणलं आणि हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्यानंतर कोण जिवंत आहे आणि कुणाचा मृत्यू झालाय, याची खातरजमा करण्याचं काम सुरू झालं. शनिवारी रात्रीपासून सुरू असणारं हे काम सोमवार सकाळपर्यंत सुरू होतं. हे वाचा -स्वतःच्याच दुकानात डल्ला, मग पोलिसांत तक्रार; 17 लाखांच्या चोरीचं फुटलं बिंग असं झालं शोधकार्य या किल्ल्याच्या परिसराचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. नागरिकांच्या बचावासाठी 23-23 जणांचे गट तयार करण्यात आले आणि त्यांनी वेगवेगळ्या भागात शोध सुरू केला. घटनास्थळी 10 रुगणवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. एकूण 27 जणांची सुटका करण्यात आली. सततचा पाऊस आणि घसरडा रस्ता यामुळे हे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होतं. मात्र अत्यंत सावधपणे सर्व जखमी आणि सर्व मृतदेह किल्ल्यावरून खाली आणण्यात यंत्रणांना यश आलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Death, India, Jaipur, Monsoon, Rajasthan

    पुढील बातम्या