मराठी बातम्या /बातम्या /देश /

105 वर्षांची आजी म्हणते, 'कोरोना माझं काही वाकडं करू शकत नाही'; 9 दिवसांत केली मात

105 वर्षांची आजी म्हणते, 'कोरोना माझं काही वाकडं करू शकत नाही'; 9 दिवसांत केली मात

आजी डॉक्टरांना म्हणाल्या की, मला काहीही होणार नाही. कोरोना माझं काही बिघडवू शकत नाही. मी लवकर बरी होऊन घरी जाईल. झालंही तसंच नऊ दिवसांच्या उपचारानंतर आजीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांनी कोरोनावर मात केली.

  • Published by:  News18 Desk

सूरत, 25 एप्रिल : कोरोनाच्या आजारावर विजय मिळवायचा असेल तर प्रत्येकानं सकारात्मक विचार आणि मजबूत इच्छाशक्ती ठेवणं गरजेचं आहे. तसं असेल तर तुम्ही कोरोनावर सहज मात करू शकता, मग अगदी तुम्ही शंभरी ओलांडली असेल तरी. हे खरं आहे. कारण सूरतच्या एका 105 वर्षीय आजींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (grandmother defeated corona 9 in days) केली आहे. कोरोना माझं काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत या आजींनी कोरोना विरोधातील युद्ध जिंकलं.

(वाचा-'नकारात्मकता नाही सकारात्मकता पसरवा'; नाशिकमधील पोलीस निरीक्षकाचा यशस्वी प्रयोग)

सूरतच्या ऊजिबा गोंडलिया या आजींची ही कहाणी आहे. 105 वर्षाच्या या आजींना कोरोनची लागण झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांना काहीशी काळजी वाटू लागली. कारण आजींचं वय. पण आजी मात्र जराही घाबरल्या नव्हत्या. उलट त्या सर्व नातेवाईकांना धीर देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याठिकाणीही सर्व आरोग्य कर्मचारी आजींची इच्छाशक्ती पाहून आश्चर्यचकित झाले. आजी डॉक्टरांना म्हणाल्या की, मला काहीही होणार नाही. कोरोना माझं काही बिघडवू शकत नाही. मी लवकर बरी होऊन घरी जाईल. झालंही तसंच नऊ दिवसांच्या उपचारानंतर आजीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांनी कोरोनावर मात केली.

(वाचा-पहिल्या Vaccine डोसनंतर झाला कोरोना; मग आता कधी घ्याल दुसरा डोस?)

आजींच्या दृढ इच्छाशक्ती समोर कोरोनालाही गुडघे टेकावे लागले. त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही त्याचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळाला. लोक कोरोनाला घाबरून तब्येत जास्त खराब करून घेतात. मात्र या आजी कोरोनाचा सामना कसा करायचा याचं उत्तम उदाहरण असल्याचं डॉक्टर म्हणाले. आजींसारखा तणावमुक्त होऊन उपचार घेतल्यास कोरोनाला सहज पराभूत करता येऊ शकतं असं डॉक्टर म्हणाले.

ऊजिबा यांचा मुलगा गोविंद यांनी सांगितलं की, आजींनी शेतीमध्ये नांगरणी, बैलगाडी चालवणं अशी अनेक काम केली आहेत. कडाक्याची थंडी असो वा उन आजी कामाला मागे हटत नव्हत्या. अजूनही स्वतःची बहुतांश कामं आजी स्वतः करतात असंही त्यांनी सांगितलं. 97 व्या वर्षी पाठिचं हाड तुटल्यानं त्यांचं ऑपरेशन झालं होतं. पण तरीही आजींची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळं तुम्ही कोरोनाचा सामना कशा पद्धतीनं करता त्यावरही बरंच काही अवलंबून असल्याचं या आजींच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

First published:

Tags: Coronavirus, Gujrat