1020 किमी लांब...3700 कोटी खर्च; पंतप्रधान मोदी देणार देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस-वेची भेट

1020 किमी लांब...3700 कोटी खर्च; पंतप्रधान मोदी देणार देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस-वेची भेट

मोदींच्या पुढाकारामुळे देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वेची निर्मिती होणार आहे

  • Share this:

वाराणसी, 23 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 30 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीत पोहोचणार आहेत. ते येथे प्रसिद्ध वाराणसी-प्रयागराज (गंगा एक्सप्रेस वे) चं उद्घाटन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या पुढाकारामुळे वाराणसी-प्रयागराजमधील लोकांना या सहा लेन एक्सप्रेस वेची भेट मिळणार आहे. एकदा हे काम पूर्ण झालं की हा एक्सप्रेस वे देशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे होईल. हा 1,020 किमी लांबीचा आहे. हा एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी सुमारे 37,000 कोटी रुपये खर्च लागणार आहेत. हा प्रकल्प उत्तर प्रदेश सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये सुरू केला होता.

देशाच्या सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधी सांगितलं होतं की, 6,556 हेक्टर क्षेत्रावरील हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. हा महामार्गाचा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित केला जाईल. गंगा एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्यात 596 किमी लांबी पूर्ण करण्यात येईल आणि मेरठ, ज्योतिबा फुले नगर, हापूर, संभळ, बदायूं, शाहजहांपूर, फर्रुखाबाद, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या जिल्ह्यांना जोडेल. यात पाच मोठे पूल, आठ रोड-ओव्हरब्रिज आणि 18 उड्डाणपूल असतील. या द्रुतगती मार्गावर सहा लेन, आठ लेनचा विस्तार अत्यंत योग्य व संपूर्ण प्रवेश नियंत्रित द्रुतमार्ग असेल. हा रस्ता पश्चिम यूपीला पूर्व यूपीला जोडेल.

हे ही वाचा-मास्क लावला नव्हता म्हणून थांबवलं; चालकाने कोरोना योद्ध्याच्या अंगावर घातली कार

एक्सप्रेस वेची सुरुवात व शेवट कोठे असेल

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी एकूण 37,350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी 9,500 कोटी रुपये जमीन अधिग्रहणावर आणि 24,091 रुपये बांधकामांच्या कामांवर खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प 70 टक्के कर्ज आणि 30 टक्के इक्विटी द्वारे अनुदानीत केला जाईल. हा एक्स्प्रेस वे मेरठमधील शंकरपूर गावाजवळील एनएच -235 पासून सुरू होईल आणि प्रयागराज जिल्ह्यातील सोरांवजवळ एनएच -330 पर्यंत संपेल.

गंगेच्या किनाऱ्यावर वृक्षलागवड

एक्सप्रेसवेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तिगरी ते उत्तर प्रदेश-उत्तराखंड सीमेपर्यंत 110 किमी लाब रस्त्याचा विस्तार केला जाईल आणि प्रयागराजपासून बलियापर्यंत 314 किमीचा आणखी एक रस्ता तयार करण्यात येईल. गंगा एक्सप्रेसवेची विशेष बाब म्हणजे हा राज्यातील अन्य एक्सप्रेसवेला लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवे, पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि बलिया लिंक एक्सप्रेसवेच्या माध्यमातून जोडला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारने गंगा एक्सप्रेसवेच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अभियान सुरू करण्याची योजना तयार केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 23, 2020, 6:21 PM IST

ताज्या बातम्या