नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : दिवाळीनंतर (Diwali 2020) देशभरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क (Mask) लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कडक केले जात आहे. नवी दिल्लीतही (Delhi) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या कारणास्तव रस्त्यावर मास्क न लावणाऱ्यांना चांगलाच दंड भरावा लागत आहे. यावेळी वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत.
रविवारी असेच एक प्रकरण दिल्लीतील मोतीनगर भागात पाहायला मिळाले. एका कर्मचाऱ्याने मास्क न लावलेल्या कारला थांबवलं तर त्याने कर्मचाऱ्यालाच चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिव्हील डिफेन्सच्या कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की, दोघेजण मास्क लावल्याशिवाय गाडी चालवत होते. जेव्हा त्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कर्मचार्याच्या अंगावर कार घातली.
हे ही वाचा-कोरोनाची लस तर तयार होईल, मात्र पुढील व्यवस्था सर्वात कठीण; तज्ज्ञ चिंतेत
रविवारी मोती नगर भागात कार चालकांना मास्क लावण्यास सांगण्या आले होते, मात्र त्यांनी कारने कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका नागरी संरक्षण स्वयंसेवकांने केला आहे. सुदैवाने स्वयंसेवक यात गंभीर जखमी होण्यापासून बचावला. सिव्हिल डिफेन्स कर्मचाऱ्याचा आरोप आहे की, एक महिला आणि एक पुरुष मास्क न लावता कारमध्ये बसले होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कर्मचार्यावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. यात कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दिल्लीत मास्क न लावणाऱ्यांकडून आता 2000 पर्यंत दंड आकारला जात आहे. पहिल्यांदा मास्क न लावणाऱ्या 500 रुपये दंड होता. सीएम अरविंद केजरीवाल यांनी हा दंड वाढवून 2000 रुपयांपर्यंत केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Delhi, Mask