मराठी बातम्या /बातम्या /nashik /श्रद्धांजलीसाठी चांगले फोटो ठेवा; Whatsapp Status ठेवून नाशकातील तरुणानं उचचलं टोकाचं पाऊल

श्रद्धांजलीसाठी चांगले फोटो ठेवा; Whatsapp Status ठेवून नाशकातील तरुणानं उचचलं टोकाचं पाऊल

Suicide in Nashik: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर याठिकाणी एका तरुणाने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Suicide in Nashik: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर याठिकाणी एका तरुणाने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Suicide in Nashik: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर याठिकाणी एका तरुणाने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सिन्नर, 14 नोव्हेंबर: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर याठिकाणी एका तरुणाने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. येथील 22 वर्षीय तरुणाने जग सोडून जात असल्याचं सोशल मीडियावर स्टेटसला (Social media status) ठेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. तरुणानं राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून मित्र परिवारांत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल उत्तम शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रहिवासी आहे. मृत तरुणाने शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या मित्रांना उद्देशून भावनिक संदेश स्टेटसला ठेवून आत्महत्या केली आहे. मृत विशाल याने स्टेटसला आपल्या मित्रांवर खूप प्रेम असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी कोणाला दुखावलं असेल तर राग मनावर घेऊ नका. सगळे आनंदाने राहा, असंही त्यानं आपल्या स्टेटसमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा-नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने त्याच स्टेटसमधून आपल्या मित्रांकडे एक शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानं आपल्या मित्रांना उद्देशून लिहिलं की, माझ्या मृत्यूनंतर भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी माझे चांगले फोटो तुमच्या स्टेटसला ठेवा, असंही त्यानं संबंधित स्टेटसमध्ये लिहिलं आहे. संबंधित तरुणाने अवघ्या 22 व्या वर्षी अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा-अस्मानी संकटांना नडला पण बँकेच्या नोटीशीपुढे हरला; शेतकऱ्यानं बँकेसमोरच दिला जीव

मृत विशालचं स्टेटस पाहून अनेकांनी त्याला समजावून सांगण्यासाठी फोन केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. विशालने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. 22 वर्षीय विशालने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास ठाणगाव पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Nashik suicide