मनमाड, 10 नोव्हेंबर : दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन ठगांनी तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून (gold ornaments theft) पसार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सटाणा तालुक्यातील ठेंगोडा (Thengoda Satana) येथे ही घटना घडली असून मोटारसायकलवरून पळून जाताना दोन्ही चोरटे सीसीटीव्हीत (caught in CCTV) कैद झाले आहेत. ठेंगोडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदीप शेवाळे यांच्या घरी दोन अनोळखी तरुणांनी चांदीच्या दागीण्यांना पॉलिश करून देतो असे सांगत घरी एकट्याच असलेल्या शेवाळे यांच्या पत्नी ललीता शेवाळे यांना चांदीच्या मूर्तीची तसेच पितळाच्या भांड्याना पॉलिश करुन दिली.
त्यानंतर या चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांनाही पॉलिश करून देतो असे सौ शेवाळे यांना सांगितले. त्यानंतर शेवाळे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची माळ व एक तोळ्याचे कानातले दागिने पॉलिश करण्यासाठी घेऊन सौ. शेवाळे यांच्या यांना पॉलिश करण्याची पावडर दिली. पावडर हातात घेतल्यानंतर त्यांना गुंगी येऊन त्या बेशुद्ध पडल्या.
— News18Lokmat (@News18lokmat) November 10, 2021
शेवाळे यांना गुंगी आली आणि दोन्ही ठगांनी हातचलाखी करून सोन्यासह पोबारा केला. सौ शेवाळे यांची गुंगी थोडी कमी होताच त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत दोघे भामटे मोटारसायकल घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी सटाणा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
जळगावात चोरट्यांची 'दिवाळी', ज्वेलरी शॉप फोडून लाखोंचे दागिने लंपास
दिवाळीपूर्वी जळगावात सराफाच्या दुकानात चोरी झाली आहे. जळगाव शहरातील सराफा दुकानात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाखांचे दागिने लंपास केले आहेत. चोरट्यांचे हे कृत्य ज्वेलर्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी ज्वेलर्स मालकाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत.
जळगाव शहरातील धाके वाडी परिसरात नंदुरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्स आहे. या दुकानात 31 ऑक्टोबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाचे कुलूप आणि दुकानातील तिजोरी फोडून पाच लाखांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सकाळी ज्वेलर्स मालकाच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आहे.
या घटनेबाबत जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि डॉग स्कॉडच्या मदतीने पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. नागरिकांनी चोरी सारख्या घटना टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Crime, Nashik