मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावात चोरट्यांची 'दिवाळी', ज्वेलरी शॉप फोडून लाखोंचे दागिने लंपास, घटना CCTV मध्ये कैद

जळगावात चोरट्यांची 'दिवाळी', ज्वेलरी शॉप फोडून लाखोंचे दागिने लंपास, घटना CCTV मध्ये कैद

चोरट्यांची 'दिवाळी' अन् व्यापाराचे 'दिवाळे', ज्वेलरी शॉप फोडून लाखोंचे दागिने लंपास, घटनेचा CCTV

चोरट्यांची 'दिवाळी' अन् व्यापाराचे 'दिवाळे', ज्वेलरी शॉप फोडून लाखोंचे दागिने लंपास, घटनेचा CCTV

Theft in jewellery shop in Jalgoan: जळगावात ज्वेलरी शॉपमध्ये चोरी, लाखोंचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

जळगाव, 31 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वी जळगावात (Jalgaon) सराफाच्या दुकानात चोरी (Theft in jewelry shop) झाली आहे. जळगाव शहरातील सराफा दुकानात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाखांचे दागिने लंपास केले आहेत. चोरट्यांचे हे कृत्य ज्वेलर्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (theft caught in CCTV) झाले आहे. या प्रकरणी ज्वेलर्स मालकाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत.

जळगाव शहरातील धाके वाडी परिसरात नंदुरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्स आहे. या दुकानात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाचे कुलूप आणि दुकानातील तिजोरी फोडून पाच लाखांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सकाळी ज्वेलर्स मालकाच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आहे.

या घटनेबाबत जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि डॉग स्कॉडच्या मदतीने पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चोरी सारख्या घटना टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

जालन्यात बँकेवर सशस्त्र दरोडा, घटनेचा VIDEO आला समोर

बँकेवर पुन्हा एकदा दरोडा (bank robbery) पडल्याची बातमी समोर आली आहे. आता जालन्यात बँकवर दरोडा पडला आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा (Bank robbery on Buldhana urban bank) पडला आहे. ही घटना गुरुवार (28 ऑक्टोबर 2021) घडली आहे. हातात पिस्तुल असलेल्या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून 25 लाख रुपयांची रोख रक्कम आणि तारण असलेले अंदाजे 75 लाखांचे सोने घेऊन पसार झाले. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद (Bank robbery caught in CCTV) झाली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत शहागड येथील बाजार पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेची शाखा आहे. कामकाजाची वेळ संपल्यानंतर खातेदारांची वर्दळ कमी झाल्याचा फायदा या दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. कर्मचारी दैनंदिन कामकाज संपवत असतांना हातात पिस्तुल असलेल्या तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडले.

यानंतर दरोडेखोरांनी कॅश काउंटर व स्ट्रॉंग रूमकडे मोर्चा वळवला. स्ट्रॉन रूममधील लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि 25 लाख रुपये रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले. या दरोड्यात नेमका किती मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नव्हती. अंदाजे 75 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Jalgaon, Jewellery shop