मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ; नातेवाईकांना बनावट Remdesivir इंजेक्शनची विक्री

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ; नातेवाईकांना बनावट Remdesivir इंजेक्शनची विक्री

Nashik Crime: नाशिकमध्ये बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Selling fake remdesivir injection) विकल्याची घटना समोर आली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे कोरोना रुग्णांच्या उपचारातील अति महत्त्वाचं इंजेक्शन आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Selling fake remdesivir injection) विकल्याची घटना समोर आली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे कोरोना रुग्णांच्या उपचारातील अति महत्त्वाचं इंजेक्शन आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Selling fake remdesivir injection) विकल्याची घटना समोर आली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे कोरोना रुग्णांच्या उपचारातील अति महत्त्वाचं इंजेक्शन आहे.

नाशिक, 10 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) नियंत्रणाबाहेर जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहेत. परिणामी कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना नाशिकमध्ये बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Selling fake remdesivir injection) विकल्याची घटना समोर आली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे कोरोना रुग्णांच्या उपचारातील अति महत्त्वाचं इंजेक्शन आहे. याच इंजेक्शनमध्ये हेराफेरी केल्याची घटना समोर आल्यानं कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील आरोग्य यंत्रणा पार कोलमडून गेली आहे. कोरोनाच्या अनेक रुग्णांना याठिकाणी उपाचारासाठी बेड उपलब्ध होतं नाहीयेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची बेडसाठी धावपळ होतं आहे. नाशिकमध्ये कालच एका रुग्णाला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णवाहिकेतच पडून राहावं लागलं आहे. ही घटना ताजी असताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत काळाबाजार उघड झाल्याने, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

नाशिकमधील एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला चक्क बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पाहिजे तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. याच गोष्टीचा गैरफायदा देखील घेतला जात नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळून त्याच्या हातावर बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन टेकवले जात आहेत.

(हे वाचा- नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड; व्हेंटिलेटर नसल्याने रग्णवाहिकेतच प्रतीक्षा, धक्कादायक VIDEO आला समोर)

संबंधित नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन डॉक्टरांकडे आल्यानंतर संबंधित इंजेक्शन बनावट असल्याचं उघड झालं आहे. आरोपी व्यक्तीनं प्रत्येकी साडे तीन हजार रुपये दराने 6 इंजेक्शन विकले होते. आपली चोरी पकडल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपी व्यक्तीनं संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांचे पैसे परत केले आहेत. पण गरजू रुग्णांना वेठीस धरून अशाप्रकारे अनेक बनावट इंजेक्शनची विक्री यापूर्वीही झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Corona updates, Crime, Nashik