मराठी बातम्या /बातम्या /nashik /

मुंबई-पुणे-नागपूर नव्हे, या शहरानं वाढवली राज्याची चिंता; देशातील पहिल्या 2 हॉटस्पॉटमध्ये समावेश

मुंबई-पुणे-नागपूर नव्हे, या शहरानं वाढवली राज्याची चिंता; देशातील पहिल्या 2 हॉटस्पॉटमध्ये समावेश

Corona cases in Maharashtra : देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आढळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा बड्या शहरांत कोरोना विषाणूने आपली पाळंमुळं घट्ट केली आहेतच. असं असलं तरी महाराष्ट्रातील हे शहर राज्याची चिंता वाढवत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नाशिक, 28 फेब्रुवारी: कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) जगातील अन्य देशांसह भारतासाठीही खूपच घातक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (Corona cases in India) आढळत आहेत. तर मृतांचा आकडाही उच्चांक गाठत आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू (Corona deaths) होणाऱ्या रुग्णांच्या आकड्यानंही 2 लाखांच्या टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशात एकूण 3 लाख 60 हजार 960 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3 हजार 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आढळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा बड्या शहरांत कोरोना विषाणूने आपली पाळंमुळं घट्ट केली आहेतच. असं असलं तरी महाराष्ट्रातील नाशिक शहर (Nashik) कोरोना विषाणूचं नवं हॉटस्पॉट (Corona virus new hotspot) बनलं आहे. देशात बंगळुरूनंतर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. पुणे, मुंबई आणि नागपूर यांसारख्या शहरात कोरोनाशी लढण्यात राज्याचं प्रशासन कमी पडत असताना, नाशिकमधील रुग्णवाढ सरकारसाठी नवी डोकंदुखी ठरत आहे.

देशाची राजधानी दिल्लीनंतर, कर्नाटकची राजधानी बंगळुरू हे शहर देशातील कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. बंगळुरूत काल मंगळवारी एकूण 17 हजार 550 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 12 हजार 436 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. याशिवाय पुणे शहर देशात चौथ्या क्रमांकावर असून काल दिवसभरात 9,078 नवे रुग्ण आढळले आहेत.

(वाचा-मोठी बातमी! 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही)

महाराष्ट्राची कोरोना स्थिती बिकट

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना आलेख वाढतच चालला आहे. मंगळवारी राज्यात 66 हजार 358 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 67 हजार 752 लोकं कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान 895 जणांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत राज्यात 44 लाख 10 हजार लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यातील 36 लाख 69 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 66 हजार 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 6 लाख 72 हजार 434 जणांवर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Corona hotspot, Corona spread, Corona virus in india, Covid-19, India, Maharashtra, Nashik