मराठी बातम्या /बातम्या /nashik /

लग्नाच्या पूर्वसंध्येला रंगली हळद, बँड-बाजा वाजताच मांडवात धडकले पोलीस आणि मग...

लग्नाच्या पूर्वसंध्येला रंगली हळद, बँड-बाजा वाजताच मांडवात धडकले पोलीस आणि मग...

लग्नाच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या हळदीत धडकले पोलीस अन्...

लग्नाच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या हळदीत धडकले पोलीस अन्...

Nashik News: अचानकपणे पोलीस वाहनाचा सायरन कानी येताच लग्नघरी पडलेल्या मांडवात शांतता पसरली.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 18 नोव्हेंबर : हळदीला (Haldi ceremony) वाजवीले वाद्य अन मांडवात धडकले पोलीस (police) अशी गमतीशीर घटना घडली आहे. पोलिसांनी चक्क ढोल-ताशा जप्त (Nashik Police detained dhol tasha pathak) केला असून विना परवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी नवरदेवासह वाजंत्री विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. लग्नबेडीत चतुर्भुज झालेल्या नवरदेवाला आता पोलिसांचाही बेडीत अडकावं लागणार असल्याच्या गमतीशीर चर्चेनं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय.

शुभमंगलच्या पूर्व संध्येल्या ढोल-ताशांच्या गजरात रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमाला अचानकपणे पोलीस येऊन धडकले. अन लग्नघरी पडलेल्या मांडवात एकच सन्नाटा पसरला. विनापरवानगी वाद्य वाजवून गर्दी जमवत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी वाजंत्रीसह नवरदेव आणि विरपित्यांस पोलीस ठाण्यात आणले.

गंगापूररोडवरील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर मल्हारखान झोपडपट्टीमध्ये जोरजोरात ढोल आणि ताशा ही पारंपरिक वाद्ये बडविली जात होती. मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सरकारवाडा पोलीस पथकासह मल्हारखान झोपडपट्टीत दाखल झाले. अचानकपणे पोलीस वाहनाचा सायरन कानी येताच लग्नघरी पडलेल्या मांडवात शांतता पसरली.

वाचा : नाशिकमधील 'या' शाळेत चक्क झाडांखाली भरतात वर्ग; विद्यार्थ्यांना मिळतात भन्नाट सुविधा

पोलिसांनी संशयित इसम नवरदेव प्रसाद संतोष बुकाने याच्याकडे वाद्ये वाजविण्याची परवानगीबाबत विचारणा केली असता बुकाने यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. प्रसाद यांच्या हळदीचा कार्यक्रम याठिकाणी सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणावर गर्दी जमलेली होती, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी तात्काळ वादय वाजविणारे वाजंत्री तसेच नवरदेवासह वरपित्यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांना समज देत विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करून कोविड-19 बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याने नवरदेव संशयित प्रसाद संतोष बुकाने त्याचे वडील संशयित संतोष बुकाने आणि वादय वाजविणारे सहा इस्माविरुद्ध भादंवि कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

नाशकात सिटी बसमध्ये कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

एका महिलेनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं सिटी बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण केली आहे. पाच दिवसांपूर्वी झालेली ही घटना बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सिटी बसमध्ये घुसून महिलेनं आपल्या साथीदारांसह कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिटी बस बोरगड वरून नाशिककडे येत असताना हा प्रकार घडला आहे.

गाडीला ओव्हरटेक का केलं याचा जाब विचारत महिला आणि तिचे साथीदार बसमध्ये घुसल्याचं समजतंय. याचा जाब विचारताना महिलेसह काही जणांनी कंडक्टर मारहाण केली आहे. ही सर्व मारहाण बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

First published:

Tags: Marriage, Nashik