मुंबई, 23 ऑक्टोबर: अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Pandey) आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाच्या (drugs case) चौकशीदरम्यान मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनन्या पांडेनं आर्यनला गांजा दिला असल्याची कबुली दिली आहे. अनन्याची आर्यनसोबत चॅटिंग केल्यावरुन एनसीबी (NCB is interrogating) तिची चौकशी करत आहे.
शुक्रवारी एनसीबीनं अनन्याची चार तास कसून चौकशी केली. आर्यनच्या मोबाईलमध्ये ड्रग्जसंदर्भातले अनन्यासोबत केलेले चॅट सापडले. एनसीबीनं गुरुवारी अनन्याच्या घरी जाऊनही तपासणी केली. तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही ताब्यात घेतला.
हेही वाचा- राज ठाकरे आजारी, मुंबई-पुण्यातील मनसेचे मेळावे रद्द
शुक्रवारी चौकशीदरम्यान अनन्यानं आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याचं एनसीबीला सांगितलं आहे. मात्र आपण कोणत्याच ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचंही तिनं म्हटलं आहे.
अनन्या गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वडील चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीला हजर झाली. यावेळी एनसीबीनं सुमारे अडीच तास तिची चौकशी केली. पुन्हा शुक्रवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं होतं. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग आणि एक महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अनन्याची चौकशी करण्यात आली.
अनन्या पांडेवर भडकले समीर वानखेडे
अनन्या पांडेची सलग दोन दिवस NCB कडून चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अनन्याला 2 वाजता NCB कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र यावेळी अभिनेत्री 2 तास उशिरा म्हणजेच 4 वाजता पोहोचली होती. त्यामुळे तिची योग्य तशी चौकशी झाली नव्हती. त्यांनतर NCB सलग दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवारी पुन्हा तिला बोलावून घेतलं होतं. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही अनन्या उशिराच पोहोचली यावेळी तिला 11 ला बोलावण्यात आलं होतं मात्र ती चक्क 3 तास उशिरा म्हणजेच 2 वाजता कार्यलयात पोहोचली होती.
हेही वाचा- Google वर सर्च करून पोटच्या मुलीला दिला भयंकर मृत्यू; आईचं राक्षसी कृत्य वाचून हादराल
त्यामुळे NCB अधिकारी समीर वानखेडे तिच्यावर प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी अनन्याला चांगलंच धारेवर धरत कडक शब्दात तिची कान उघडणी केली आहे. यावेळी वानखेडे यांनी अनन्याला म्हटलं, 'हे तुमचं शूटिंग नाही. किंवा तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे NCB चं कार्यालय आहे. याठिकाणी दिलेल्या निश्चित वेळीच तुम्हाला यावं लागेल. अधिकाऱ्यांना तुमच्यासाठी वाट बघत बसायला वेळ नाही'. असं म्हणत त्यांनी अभिनेत्रीला सुनावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.