MP तून बेपत्ता झालेली बहीण सापडली साईंच्या शिर्डीत; सोशल मीडियावरील त्या एका VIDEO मुळे पडली गाठ

MP तून बेपत्ता झालेली बहीण सापडली साईंच्या शिर्डीत; सोशल मीडियावरील त्या एका VIDEO मुळे पडली गाठ

गेल्या महिन्यात राखीपौर्णिमेच्या दिवशी ही बहिण बेपत्ता झाली होती. ती अखेर साईंच्या शिर्डीत सापडली.

  • Share this:

शिर्डी, 16 सप्टेंबर : रक्षाबंधनाच्या दिवशी मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) हरवलेली बहीण भावांना साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) सापडली आहे. मंदिर बंद असताना साईभक्तांना बाबांची आरती बघायला मिळावी यासाठी शिर्डीतील सुनिल परदेशी यांनी असं काही केलं की भावा-बहिणीची गाठ झाली आहे.

गेल्या महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी मध्यप्रदेश राज्यातील जुनाडदेव येथील 65 वर्षीय कांता निघलानी आपल्या दिनक्रमानुसार सकाळी फिरायला बाहेर पडल्या. मात्र त्या घरी परतल्याच नाही. बहिणीच्या प्रेमाणे भाऊ व्याकुळ झाले होते. बहिणीची शोधाशोध करूनही हाती निराशा आल्याने त्यांनी बहीण हरवल्याची तक्रार तेथील पोलीस स्टेशनला दाखल केली होती. (madhya pradesh Sister lost on Rakhipurnima Found in Sai Babas Shirdi)

त्या कुठे गेल्या याचा काहीही थांगपत्ता घरच्यांना नव्हता. शिर्डीतील साईमंदिर बंद असल्याने देेशभरातील भाविकांना साईंचे दर्शन मिळावे यासाठी शिर्डीतील शिवसैनिक सुनिल परदेशी हे रोज काही वेळाचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकायचे. काल असाच एक व्हिडीओ त्यांनी काढला आणि दिल्लीच्या‌ साईभक्तांच्या ग्रुपवर पाठवला.

हे ही वाचा-नशीब म्हणायचं की चमत्कार? डोक्यावरून ट्रॅक्टर जाऊनही वाचला जीव, पाहा VIDEO

आजींचा डोळयात अश्रु दाटलेला काकड आरतीचा हा व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आणि तो आजींच्या नातेवाईकांपर्यत पोहोचला. व्हिडीओ पाठवणाऱ्याचा‌‌ शोध घेत ते सुनिल परदेशी यांच्या‌ संपर्कात आले आणि परदेशी यांना फोन करून त्यांनी सर्व घटना सांगितली. सुनिल परदेशी यांनी सदर महिलेचा साईमंदिर परिसरात शोध घेत तिला भेटून घरी नेले व त्यांची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तत्काळ आजीचे भाऊ स्थानिक पोलिस स्टेशनच्या मदतीने शिर्डीकडे मार्गस्थ झाले आणी आज या आजीची पुन्हा कुटुंबीयांशी गाठ पडलीय.

सुनिल परदेशी यांनी काढलेल्या या व्हिडिओमुळे एका आजीला आपले कुटुंबीय पुन्हा परत मिळाले. एकीकडे सोशल मीडियामुळे अनेकांची घरे उध्वस्त होताना सोशल मीडियाचा असाही फायदा होवू शकतो हे सिद्ध झालं आहे. कांता निघलानी या आपल्या एकुलत्या एक मुलगा असलेल्या अंशुमनकडे राहत होत्या. मात्र सून आणी मुलाकडून सुरू असलेल्या मानसिक आणी शारीरीक जाचाने त्या कंटाळल्या असल्याची माहिती आहे. रक्षाबंधानाच्या दिवशी हरवलेल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आता भावांनी घेतली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 16, 2021, 6:54 PM IST

ताज्या बातम्या