मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Nashik: नाशकातले मालामाल कांदा व्यापाऱ्यांकडून 26 कोटी जप्त, तब्बल 19 तास रक्कम मोजत होते अधिकारी

Nashik: नाशकातले मालामाल कांदा व्यापाऱ्यांकडून 26 कोटी जप्त, तब्बल 19 तास रक्कम मोजत होते अधिकारी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

नाशकातून (Nashik) एक अवाक करणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून तुम्हाही अवाक व्हाल.

  • Published by:  Pooja Vichare

नाशिक, 24 ऑक्टोबर: नाशकातून (Nashik) एक अवाक करणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून तुम्हाही अवाक व्हाल. नाशिकमधील पिंपळगाव बाजार समितीतील (raided onion traders) कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागानं (Income tax department) छापेमारी केली. हे छापासत्र शनिवारी पूर्ण झालं. धक्कादायक म्हणजे या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. गेल्या चार दिवसांपासून सलग एकाच ठिकाणी आयकर विभागानं ही कारवाई केली आहे.

आयकर विभागानं केलेल्या या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सलग एकाच ठिकाणी नाशिकमधील 4 ते 5 आणि पिंपळगावच्या 8 ते 10 व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी छापासत्र सुरु केलं होतं.

हेही वाचा- तृतीयपंथी असल्याचा बनाव करुन लुटलं 9 तोळं सोनं, वर्षभरानंतर भामट्याला बेड्या

जवळपास 150 ते 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं दिवस-रात्र व्यापाऱ्यांच्या निवासस्थानासह त्यांच्या कार्यालयात छापेमारी केली. इतकंच काय तर अधिकाऱ्यांनी या कांदा व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांचीही तपासणी केली. या तपासणीत आयकर विभागाला अनेक महत्त्वाची माहिती हाती लागली आहेत.

रोख रक्कम मोजायला लागले 19 तास

आयकर विभागाच्या 80 कर्मचाऱ्यांना रोख रक्कम मोजायला तब्बल 19 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. पथकानं जप्त केलेली रोख रक्कम मोजण्यासाठी पथकाच्या 70 ते 80 अधिकारी- कर्मचाऱ्यांना नाशिक आणि पिंपळगावमधील काही बँकांमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता रक्कम मोजण्यास सुरुवात केली. तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत ही रक्कम मोजून पूर्ण झाली. म्हणजे जवळपास 18 ते 19 तास रोकड मोजण्यास लागले. 26 कोटींच्या रकमेत 500, 100 आणि 200 च्या नोटा सर्वाधिक होत्या.

First published:

Tags: Nashik, Onion