मुंबई, 24 ऑक्टोबर: मुंबईत (Mumbai) एक विचित्र प्रकार घडला आहे. तृतीयपंथी (Transgender) असल्याचा बनाव करुन लोकांना गंडा घालणाऱ्याच्या पोलिसांनी (Mumbai Police) मुसक्या आवळल्या आहेत. जेरबंद करण्यात आलेला गुन्हेगार स्वतःला तृतीयपंथी असल्याचं भासवत होता. तसंच तुमच्या घरात संकट आलं आहे. त्याचं निवारण करतो, असं सांगून नागरिकांची लूट करत होते. तृतीयपंथी बनून आरोपी लोकांना गंडा घालत होता. गंडा घालणाऱ्या या भामट्याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. तुमच्या घरात संकट आलं आहे, त्या संकटाचं निवारण मी करतो, असं सांगायचा. असं सांगून यानं अनेकांना गंडा घातला आहे. हेही वाचा- ‘ ‘राजसाहेब, आता आपणही मास्क परिधान करा’’, राष्ट्रवादीच्या नेत्यानं केली विनंती जितूभाई जव्हेरभाई परमार असं या बोगस तृतीयपंथीचं नाव आहे. गेल्या वर्षी पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या दाणाभाई पटेल यांच्या घरी हा जितूभाई तृतीयपंथी बनून आला होता. त्यांनं पटेल यांच्या घराबाहेर काळी फुल्ली मारली आणि तुमच्या घरावर घोर संकट आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. घरावरच्या संकटाबाबत बोलल्यावर पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्याला घरात घेतलं. त्यानंतर त्यानं पाण्याच्या ग्लासमध्ये थोडी मिरची आणि मीठ टाकून आणा असं पटेल कुटुंबियांना सांगितलं. ते पाणी पिऊन टाकून मी आपलं संकट पिऊन टाकलं असं म्हटलं. हेही वाचा- T20 World Cup, India vs Pakistan: विजयी भव! वाराणसीमधील गंगा आरतीमध्ये टीम इंडियासाठी प्रार्थना धक्कादायक म्हणजे हा प्रकार केल्यनंतर त्यानं घरातल्या कुटुंबियांच्या अंगावरील प्रत्येकी एक असा सोन्याचा दागिना एका रुमालामध्ये ठेवण्यास सांगितला. तो रुमाल घेऊन मागे न पाहता चालण्यास सांगितलं. तुमच्या हातातील रुमाल माझा हातात द्या आणि मागे न बघता चालत राहा, असं त्यानं पटेल कुटुंबियांना सांगितलं. असं सांगितल्यावर जितूभाईनं सर्व सोनं स्वतःकडे घेतलं आणि मागच्या मागे पसार झाला. या भामट्यानं तृतीयपंथी असल्याचा बनाव करत पटेल यांचं तब्बल 9 तोळे सोनं लुटून पसार झाला होता. त्यानंतर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. गेले वर्षभर पंतनगर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो हाती लागला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याहून धक्कादायक समोर आलेली माहिती म्हणजे, मेडिकल केल्यानंतर तो तृतीयपंथी नसल्याचंही समोर आलं. आरोपी जितूभाईनं गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. महाराष्ट्रातही त्यानं असे गुन्हे केल्याचं उघड झालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







