नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद तर रविवारीही...

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद तर रविवारीही...

त्यामुळे नाशिककरांनी आधीच याची तयारी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • Share this:

नाशिक, 21 मे : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुकणे आणि गंगापूर धरणाला वीजपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा पावसापूर्व कामांसाठी खंडित करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा हा शनिवारी बंद राहणार आहे. तर रविवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.

नाशिक शहरातील पावसाळा पूर्व कामामुळे 22 मेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे अस आवाहन पाणीपुरवठा विभागाचे वतीने करण्यात आलं आहे. गंगापूर धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलसाठी महावितरणाच्या 132 केव्ही सातपूर आणि 132 केव्ही महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडर वरून 33 केव्ही करण्यात येतो. तसेच मुकणे धरण पंपिंग स्टेशनला गोंदे येथून महावितरण कंपनीच्या रेमंड सबस्टेशन वरून 33 केव्ही वीजपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही फिडर ओव्हरहेड लाईनच्या पावसाळा पूर्व कामांमुळे पाणीपुरवठा आणि शनिवारी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा होणार नाही.

हे ही वाचा-मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित

यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून ठेवावे असं आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुकणे आणि गंगापूर धरणाला वीजपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा पावसापूर्व कामांसाठी खंडित करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा हा शनिवारी बंद राहणार आहे. तर रविवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.

नाशिक शहरातील पावसाळापूर्व कामामुळे 22 मेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुकणे आणि गंगापूर धरणाला वीजपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा पावसापूर्व कामांसाठी खंडित करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आलाय. यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा हा शनिवारी बंद राहणार आहे तर रविवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे. नाशिक शहरातील पावसाळा पूर्व कामामुळे 22 मेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 21, 2021, 8:42 PM IST

ताज्या बातम्या