नाशिक, 18 जून: सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मैत्री (Friendship) करून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं प्रेमाचा बनाव करत पीडितेला जाळ्यात ओढल्याचा आरोपी कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून संशयित आरोपी तरुणाला ताब्यात (Accused arrest) घेण्यात आलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. संबंधित आरोपी आणि पीडित मुलगी दोघंही नाशिकमधील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी इन्स्टाग्रावरून (Instagram) एकमेकांना फॉलो केलं होतं. यानंतर दोघांत बातचित व्हायला सुरुवात झाली. यानंतर संबंधित तरुणानं प्रेमाचा बनाव करत अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच पीडितेसोबत घट्ट मैत्री असल्याचं सांगून विश्वास संपादन केला. दरम्यानच्या काळात आरोपीनं पीडितेची वारंवार भेट घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातूनच ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. यानंतर घाबरलेल्या मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. हे ही वाचा- नराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासहित अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं कसं महागात पडू शकतं हे यावरुन दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.