बस्ती, 17 जून : नातेसंबंधांना लाजिरवाण्या ठरणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. अशाच एका घटनेत नराधम बापाने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करणाऱ्या पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढलं. यानंतर पत्नीने पोलिसात जाऊन तक्रार दिल्यानंतर या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
याआधीही अनेकदा मुलीवर केला होता बलात्कार
दीड वर्षापूर्वीही नराधम बापानं त्याच्या 15 वर्षांच्या मुलीवर अनेकदा शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. तेव्हा पत्नीने याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून पकडले जाण्याच्या भीतीनं या नराधमानं पलायन केलं होतं. तो दिल्लीत राहत होता. येथून परत आल्यानंतर 16 जूनला त्यानं त्याच्या मुलीवर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, याला विरोध करणाऱ्या पत्नीला त्यानं मारहाण करत घराबाहेर काढलं. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
अखेर नराधम बाप जेरबंद
पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. सध्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. याच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.
हे वाचा -
धक्कादायक! पोस्ट शेयर करत अभिनेत्रीने 14 लोकांवर केला लैंगिक शोषणाचा आरोप
या नराधम बापाचा स्व:तच्याच पोटच्या मुलीवर नेहमी डोळा असायचा. तो घरात आल्यानंतर मुलीला नेहमी त्रास द्यायचा, त्यामुळे तो घरात असल्यानंतर मुलीच्या आईला नेहमी चिंता लागली असायची. स्व:तच्या मुलीलाच त्यानं वासनेची शिकार बनवलं होतं. अनेकदा समाजातील बदनामी पायी त्याचा अत्याचार मुलीसह तिच्या आईने सहन केला होता. मात्र, या नराधम बापाचा घाणेरडा प्रकार वाढत असल्यानं अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.