नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला; चॉपरने वार करत केलं रक्तबंबाळ

नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला; चॉपरने वार करत केलं रक्तबंबाळ

Crime in Nashik: नाशिक शहरातील अशोक नगर परिसरात एका तरुणाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह (Shiv Sena incumbent) तिघांवर चॉपरने जीवघेणा हल्ला (Deadly attack on three people) केला आहे.

  • Share this:

नाशिक, 07 नोव्हेंबर: नाशिक (Nashik) शहरातील अशोक नगर परिसरात एका तरुणाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह (Shiv Sena incumbent) तिघांवर चॉपरने जीवघेणा हल्ला (Deadly attack on three people) केला आहे. या हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले (All three injured) आहे. चॉपरने हल्ला केल्याची घटना घडताच परिसरात खळबळ उडाली आहे. आसपासच्या लोकांनी तातडीने तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

श्याम फर्नांडिस असं हल्ला झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तर सागर जाधव आणि राजू उगले असं दोघां जखमी तरुणांची नावं आहेत. संबंधित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सातपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करत संशयित आरोपी संतोष ढमाळ याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.

हेही वाचा-एकच घाव अन् खेळ खल्लास; नालासोपाऱ्यात भाऊबीजेदिवशीच वृद्ध महिलेची निर्घृण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिवसेना पदाधिकारी श्याम फर्नांडिस आणि त्यांचे दोन साथीदार सागर जाधव आणि राजू उगले हे तिघे दोन भावांमधील भांडणं सोडवण्यासाठी अशोक नगर येथील जाधव संकुलात गेले होते. भांडण सोडवत असताना वाद वाढत गेल्याने, संशयित आरोपी संतोष ढमाळ याने आपल्या जवळील धारदार चॉपरने श्याम फर्नांडिस आणि त्यांच्या दोन साथीदारांवर हल्ला केला. या हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा-मुंबई: रात्रपाळीस गेलेला नवरा घरी परतला अन् भयावह अवस्थेत दिसली नवविवाहित पत्नी

ही घटना उघडकीस येताच, स्थानिकांनी संबंधित तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. दोघा भावांचा वाद सोडवण्यास गेल्यावरून अंतर्गत वादातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका राजकीय पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: November 7, 2021, 1:21 PM IST

ताज्या बातम्या