लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 11 जुलै : नाशिकमधील (Nashik) खोडे नगरमधील (Khode Nagar) एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत (Viral video) दोन गटांत जोरदार हाणामारी (Clash between two groups) झाल्याचं आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीची घटना कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार सुरू असल्याचं दिसून आलं.
मिळालेल्या माहितीनुसासार, जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटनांत तुंबळ हाणामारी आणि त्यानंतर दगडफेक सुद्धा झाली. हा प्रकार सुरू असताना घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झाल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. खोडे नगरमधील 8 ऑगस्टची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जमिनीच्या वादातून पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी pic.twitter.com/PuPlvciAHn
— News18Lokmat (@News18lokmat) August 11, 2021
असा नाचला असा नाचला; अखेर ढोलवाल्याने ढोल सोडून त्यालाच बडवलं; पाहा Funny dance video
हाणामारीच्या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुरावा नष्ट करण्यासाठी दगड फेकून सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. सर्व प्रकार सुरू असतांना पोलिसांनी मात्र घटनास्थळावरून चुपचाप निघून जाण्याचा निर्णय घेतल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.
नाशकातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी
काही दिवसापूर्वी नाशिक शहरातील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत सोसायटीतील रहिवाशांत किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाल्याचं पहायला मिळत आहे. नाशिकमधील सिडको भागातील एका सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या घटनेत महिलांना देखील मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. किरोकोळ कारणावरून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोसायटी चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मारहाण केल्याचा आरोप सोसायटीतील महिलेने केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.