जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / "वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करतायत" फडणवीसांचा गंभीर आरोप

"वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करतायत" फडणवीसांचा गंभीर आरोप

"वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करतायत" फडणवीसांचा गंभीर आरोप

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा दौरा करुन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 30 एप्रिल: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्यापही कायमच आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय सुविधा (Medical facilities) उपलब्ध होत नाहीयेत. ऑक्सिजन (Oxygen), रेमडेसिवीरचा (Remdesivir) तुटवडा निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीवरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारमधील बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा जास्त आहे. नाशिकमध्ये रेमडेसिवीरचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. आमचा प्रयत्न आहे की, अधिक रेमडेसिवीर उपलब्ध करुन द्यावेत. सफाई कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती करण्यात यावी. पीएम केअर फंडातून नाशिकला 4 प्लॅन्ट, नाशिकला अतिरिक्त 2 ऑक्सिजन टँकर्स रिलायन्स आणि जिंदालकडून मिळणार आहेत आणि या संदर्भात आम्ही स्वत: प्रयत्न करुन संवाद करुन दिला. केंद्राच्या मदतीशिवाय राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले का? विखे पाटलांचा ठाकरे सरकारला थेट सवाल ऑक्सिजनची समस्या सुटण्यासाठी आम्ही प्रशासनाला मदत करत आहोत. देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला गेला आहे. त्याचं नियोजन राज्य सरकारने केलं पाहिजे. मात्र, बलशाली नेते आपल्या भागात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन खेचून नेत आहेत. मंत्री आणि वजनदार नेते आपल्या भागात पुरवठा अधिक करुन घेत आहेत हे अयोग्य आहे. सरकारने औषध आणि इतर सुविधांचे वाटप समान प्रमाणात करावे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गरज आणी मागणीच्या आधारावर केंद्र सरकारने पुरवठा नियोजन केलं आहे. राज्य सरकारने वारंवार केंद्राकडे बोट न दाखवता योग्य नियोजन करावं. केंद्र सरकारने सीरम आणी भारत बायोटेकला लस निर्मिसाठी पैसे दिले. प्रोडक्शन जसं हातात येईल तसं वितरण केलं जाईल. माझा दौरा माहीत नसावा म्हणून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, यामुळे फक्त विभागीय आयुक्तांसोबत भेट झाली, साधारणपणे असं होत नाही,नाशिकला झालं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात