नाशिक, 17 जुलै : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. नाशिकमधील भाजप (BJP) नेत्यांसोबत बैठक आणि इतर संघटनात्मक बैठक घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असातनाच चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर पोहोचले. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचा दौरा असला राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना एक मोठे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
राज्यातील अनेक राजीकय नेत्यांच्या विरोधात ईडी (ED)कडून कारवाई सुरू आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र, रात्रीतून कुणालाही अटक होऊ शकते. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले असून अटकेची टांगती तलवार कोणावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना ईडीचा दणका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, काही घडलं नसेल तर चौकशी ला घाबरण्याचे कारण नाही. चौकशा होतील काही केलं नसेल तर निष्पन्न होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नाही, आम्ही अन्यायाच्या विरोधात आक्रमक आहोत. संजय राठोड आणि साखर कारखाना विरोधात आम्ही आवाज उठवला. महाविकास आघाडीतल्या कुठल्याही एका पक्षाच्या विरोधात नाही.
मनसेसोबत युती?
भाजप आणि मनसेची युती होणार का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जोपर्यंत परप्रांतीय संदर्भात आपलं धोरण मनसे बदलत नाही तोपर्यंत युती शक्य नाही. मात्र राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवा असलेले नेतृत्व आहेत. एकट्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येण शक्य नाही. राज ठाकरे यांनी व्यापक राजकारणात आले तर युती शक्य आहे. योग आला तर त्यांची नाशिकमध्ये भेट घेईन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Nashik