जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / अलर्ट! कोरोनाबरोबरच नव्या आजारामुळे नाशिक हादरलं; आतापर्यंत 24 जणांचा बळी

अलर्ट! कोरोनाबरोबरच नव्या आजारामुळे नाशिक हादरलं; आतापर्यंत 24 जणांचा बळी

अलर्ट! कोरोनाबरोबरच नव्या आजारामुळे नाशिक हादरलं; आतापर्यंत 24 जणांचा बळी

डॉक्टरांनी सांगितलं की, छोट्या छोट्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका. स्वत:ची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 4 मे: राज्यातील नाशिक शहरात (Nasik City) चक्कर येण्याच्या कारणामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या नव्या आजारामुळे डॉक्टरदेखील हैराण आहेत. आता शहरात या नव्या आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील विविध भागांमधील राहणाऱ्या या पाच जणांना आधी छातीत दुखत असल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कोरोना महासाथीमध्ये नाशिकमध्ये या आजाराची चर्चा सुरू आहे. 20 एप्रिल रोजी चक्कर येईन बेशुद्ध झाल्यामुळे एकाच दिवसात 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वीच्या आठवड्यात 13 जणांचा देखील असाच बळी गेला होता. 15 एप्रिल रोजी 9 जणांची देखील या अदृश्य आजारामुळे निधन झालं होतं. दोन आठवड्यांपूर्वी 24 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे तरुणांमध्येही हा आजार दिसून येत आहे. मृतांपैकी अनेकजण भररस्त्यात चालत असताना चक्कर येऊन कोसळले, तर काहींना घरातच चक्कर आल्याचं वृत्त आहे. हे ही वाचा- अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना हिट स्टोकचा परिणाम नाशिकमध्ये या विचित्र आजाराचं मूळ कारण डॉक्टरांनाही कळत नसल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीची लक्षणं पाहून डॉक्टरांना हे मृत्यू हिट स्ट्रोकमुळे आल्याची  शक्यता व्यक्त केली आहे. या या मृत्यूंमागील खरं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना अपील केली आहे की, चक्कर येण्याच्या घटनांना दुर्लक्ष करू नये. त्याशिवाय घरातून निघतानाही काळजी घेतली जावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात