Home /News /aurangabad /

अरे चाललंय तरी काय? अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू; पंकजा मुंडेंनी केली 'ही' मागणी

अरे चाललंय तरी काय? अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू; पंकजा मुंडेंनी केली 'ही' मागणी

बीड जिल्हा रुग्णालयात अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

  बीड, 24 एप्रिल: महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत असताना आता बीड (Beed)मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू (2 covid patients died) झाला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चौकशीची मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं, "पहाटे बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड 7 मध्ये कोविड पॉझिटिव्ह असलेले 2 रुग्ण दगावले. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून सखोर चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.' महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पहायला मिळत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. त्यातच आता ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्रात इतर राज्यांतून वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यात येत आहे. शुक्रवारी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन घेऊन एक एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली. बीडमध्येही ऑक्सिजन बंद झाल्याने 6 जणांचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप तीन दिवसांपूर्वी बीडमध्ये 6 रुग्णांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंत तीर्थ कोविड रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले होते. तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन टँक लीक होऊन 22 रुग्णांनी आपले प्राण गमावले होते.

  तुमच्या शहरातून (औरंगाबाद)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Beed, Coronavirus, Pankaja munde

  पुढील बातम्या