VIDEO : मुसळधार पावसामुळे द्रुतगती मार्गावरील पूल खचला; रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा..

VIDEO : मुसळधार पावसामुळे द्रुतगती मार्गावरील पूल खचला; रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा..

या घटनेचा एक VIDEO समोर आला आहे. ज्यात रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे.

  • Share this:

वाशिम, 10 जून : शेलूबाजार येथील मरीआई मंदिराजवळील पूल खचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील नागपुर - औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग पुरामुळे बंद झाला होता. त्यामुळे तब्बल गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली होती. पूल खचल्यामुळे वाहनाच्या दोन्ही बाजूनी रांगा लागल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूल खचल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

हे ही वाचा-VIDEO : पावसाचं महाभयंकर रुप, पाहता पाहता पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज दुपारपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत आहे. हा या मान्सून मधील पहिलाच जोरदार पाऊस असल्यानं अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.

जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरात ही मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातून जाणारा नागपुर - औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग साडे चार वाजेदरम्यान शेलू बाजारा नजीक असलेल्या मरी आई नाल्याला मोठा पूर येऊन पूल खचल्यानं बंद झाला होता. त्यामुळं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल 1 ते दीड तासांनंतर हळू हळू वाहतूक सुरू झाली.

या पुलाची ऊंची वाढविण्याची वाहनचालक आणि ग्रामस्थांची मागील कित्येक वर्षांपासून होत असलेली मागणी अद्याप अपूर्ण आहे. बुधवारी रात्री दरम्यान मंगरुळर आणि मानोरा तालुक्यात पाऊस पडल्यानं अरुणावती नदीला पूर आल्यानं मानोरा ते कोंडोली या रस्त्यावर गावानजीक असलेला अरुणावती नदीवरील पूल वाहून गेला आहे.

त्यामुळं कोंडोली, एकलारा, आसोला, मोहगव्हाण पारवा या चार गावांचा थेट संपर्क तुटला आहे. दरम्यान पहिल्याचं पावसात पूर वाहून गेल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. असाच पाऊस कोठारी परिसरात ही पडला त्यामुळं अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी ही केली मात्र आजच्या तडाखेबाज पावसामुळं ही पेरणी वाया गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात येत्या 3 चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून शेतकऱ्यांनी 17 जून नंतर खरिपाच्या पेरण्या करण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: June 10, 2021, 7:01 PM IST

ताज्या बातम्या