Home /News /maharashtra /

संगमनेर पोलिसांवर हल्ला प्रकरण; चौघांना अटक, CCTV फूटेजवरुन इतरांचा शोध सुरू

संगमनेर पोलिसांवर हल्ला प्रकरण; चौघांना अटक, CCTV फूटेजवरुन इतरांचा शोध सुरू

अहमदनगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अहमदनगर, 8 मे : संगमनेर शहरात (Sangamner City) दोन दिवसांपूर्वी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला (Mob attack on police personnel) केल्याची घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 4 आरोपीना अटक (4 accused arrested) केली असून सीसीटीव्हीच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी अहोरात्र पोलीस कर्मचारी मेहनत करत आहेत मात्र, याच पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे घडला. VIDEO: गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण आणि दगडफेक, जमावाची संतप्त प्रतिक्रिया संगमनेर येथे घडलेल्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. तसेच या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला होता. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, काही नागरिकांचा जमाव हा पोलीस कर्मचाऱ्याला घेरून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाक्याजवळ ही घटना घडली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून या घटनेनंतर मुस्लिम समाजाला सोशल मीडियातून बदनामी सूरु असून याकडं लक्ष वेधण्यासाठी आणि हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम समाजाने पोलिसांना निवेदन दिले. मोजक्या लोकांमुळे समाज बदनाम होत असून कारवाई करताना जे खरे आरोपी आहे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाव्दारे केली असून पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा सुद्धा निषेध करण्यात आला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Attack on police

पुढील बातम्या