Home /News /nagpur /

Breaking News: नागपुरात भीषण अपघात, ट्रक-टवेराच्या धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू

Breaking News: नागपुरात भीषण अपघात, ट्रक-टवेराच्या धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू

Nagpur Accident: या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. उमरेड मार्गावरील मौजा उमरगाव राम कुलर कंपनीजवळ ही दुर्घटना घडली.

नागपूर, 07 मे: नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) उमरेड रोडवर भीषण अपघात ( Tragic Accident) झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. उमरेड मार्गावरील मौजा उमरगाव राम कुलर कंपनीजवळ ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 5 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. उमरगाव फाट्या जवळ ट्रक आणि टवेरा कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 11 वाजताच्या सुमारास टवेरा कार ही नागपूरच्या दिशेने येत होती. ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. कार खूप वेगाने असल्याने ट्रकला जोरात धडक दिली. कारमध्ये दहा प्रवासी होते त्यापैकी सात प्रवाशांचा मृत्यू झाला तीन प्रवासी जखमी झाले त्यामध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे. Benefits of Walnuts: टाइप-2 डायबिटीजपासून ते BP पर्यंत अक्रोड खाण्याचे आहेत खास फायदे  सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावं आहे. तर उर्वरित मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच हुडके‌श्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nagpur News

पुढील बातम्या